आवृत्ती पुणे

रोख रकमेसह पावणेदोन लाखांवर चोरट्यांचा डल्ला

उत्तमनगर पोलिसांत फिर्याद : पोलादपूर-चांदणी चौक प्रवासादरम्यान झाली चोरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पोलादपूर-चांदणी चौक दरम्यान एसटी व रिक्षाने प्रवास करताना चोरट्याने एक लाख ७१ हजार रुपयांवर डल्ला मारला. ही घटना १७ जानेवारी २०२२ रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी तीनच्या दरम्यान घडली. विठ्ठल लक्ष्मण पार्टे (वय ७०, रा. स्वागत अपार्टमेंट, म्हाडा कॉलनी, कोकरी … Read more

कोयते व काठ्या हवेत फिरवून धमकावणाऱ्यांवर गुन्हा

कोंढवा पोलिसांत फिर्याद : शिवनेरीनगरमधील डीपी रोडवर घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोयते व काठ्या हवेत फिरवून आमच्या नादाला लागाल, तर संपवून टाकू, अशी धमकी देणाऱ्या पाच-सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. कोंढव्यातील शिवनेरीनगरमधील डी. पी. रोडवर १६ जानेवारी २०२२ रोजी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली.मल्हारी पवार (वय ५२, रा. शिवनेरीनगर, … Read more

रिक्षाची काच फोडून कोयत्याच्या धाकाने धमकावणाऱ्यांवर गुन्हा

विश्रांतवाडी पोलिसांत फिर्याद : कळसगावातील आळंदी रोडवर पसरविली दहशत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रिक्षाची काच फोडून हातात कोयता घेऊन कोणाला जीवंत सोडणार नाही, असे धमकावणाऱ्या दोघांसह सात-आठ साथीदारांवर विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. कळसगावातील आळंदी रोडवर १६ जानेवारी २०२२ रोजी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. सोमनाथ भगत (वय ४२, रा. … Read more

कोयत्याने वार करून दहशत पसरविणाऱ्या तिघांवर गुन्हा

कोथरूड पोलिसांत फिर्याद : कोथरूडमधील नवभूमी गणपती मंदिराजवळ घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तुला लय माज आलाय का, तुझा गेम केला पाहिजे, असे म्हणत कोयत्याने वार करून परिसरात दहशत पसरविणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कोथरूडमधील नवभूमी गणपती मंदिराजवळील गल्लीत १६ जानेवारी २०२२ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.कोथरूडमधील १६ वर्षीय … Read more

लग्नाच्या आमिषाने 14 वर्षाच्या मुलीला केले गर्भवती

स्वारगेट पोलिसांत फिर्याद : उलट्या झाल्याने सोनोग्राफी केल्यानंतर उघडकीस आला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घरी आलेल्या मामे भावाने लग्नाचे आमिष दाखवून १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिला गर्भवती केल्याचा प्रकार समोर आला आहे. १५ ते २० ऑक्टोबर २०२१ दरम्यान हा प्रकार घडला. त्यानंतर हा मामेभाऊ गुजरातला निघून गेला. याप्रकरणी गुलटेकडी येथील … Read more

अंगावर गाडी घालतो का म्हटल्याने कोयत्याने केले वार

येरवडा पोलिसांत फिर्याद : येरवड्यात अण्णा भाऊ साठे सभागृहासमोर केली मारहाण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अंगावर गाडी घालतो का असे म्हटल्याने एका तरुणाला गुंडाने कोयत्याने मारहाण करुन त्याच्या घरी जाऊन आई, पत्नी, भावाला बेदम मारहाण करुन जखमी केल्याचा प्रकार येरवड्यातील यशवंतनगर येथे घडला. संतोष मारुती महाडिक (वय ४४, रा. नेताजीनगर, येरवडा) यांनी येरवडा … Read more

‘लागिरं झालं जी’ सिरियलमधील अभिनेत्याचं अपघाती निधन

रोटी घाटात झाला अपघात : बारामतीमध्ये उत्कृष्ट कलाकार गमावल्याने हळहळ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : झी मराठी वाहिनीवरील ‘लागिरं झालं जी’ या सिरियलमधील अभिनेता डॉ. ज्ञानेश माने यांचं दुर्देवी निधन झालं. 14 जानेवारी रोजी त्यांचं अपघाती निधन झालं. डॉ ज्ञानेश माने हे रोटी घाटातून प्रवास करतेवेळी त्यांच्या गाडीचा अपघात झाला. त्या अपघातात त्यांचा दुर्देवी … Read more

यवतमध्ये महाबँकेच्या २३ लाखांवर चोरट्यांचा डल्ला

गॅस कटरने फोडले एटीएम : चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून, पोलीसांचा तपास सुरू महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : यवत (ता. दौंड, जि. पुणे) येथील महाबँकेच्या एटीएमवर दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात दरोडेखोरांनी गॅस कटरने एटीएम मशीन फोडून तब्बल 23 लाख रुपयांची रक्कम चोरुन नेली. पुणे-सोलापूर महामार्गालगत यवतमधील बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएम … Read more

पीएमपी बसमध्ये २५ हजार रुपयांच्या सोन्याची चैनचोरी

स्वारगेट पोलिसांत फिर्याद : भारती विद्यापीठ-स्वारगेट दरम्यान बसमध्ये घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भारती विद्यापीठ- स्वारगेट दरम्यान पीएमपी बसमध्ये ज्येष्ठ महिलेची २५ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन अज्ञात चोरट्याने चोरून नेली. रविवारी (दि. १५ जानेवारी २०२२) दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान बसमध्ये चोरट्याने डाव साधला.स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये ७५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली … Read more

पहारेकऱ्याचा मोबाईल चोरट्याने चोरून नेला

हडपसर पोलिसांत फिर्याद : काळेपडळ येथील गणेश विहार सोसायटीसमोरील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सोसायटीच्या गेटवरील पहारेकऱ्याचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. काळेपडळ येथील गणेश विहार सोसायटीच्या गेटसमोर रविवारी (दि. १६ जानेवारी २०२२) रात्री एकच्या सुमारास ही चोरीची घटना घडली. अनिल टमट्टा (वय २०, रा. काळेपडळ, हडपसर, पुणे) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद … Read more