प्रा.खलील सय्यद सर कार्याध्यक्ष जिल्हा काँग्रेस (congress) कमिटी यांचा तालुका काँग्रेस कमिटी कळंबच्या वतीने जाहीर सत्कार.

प्रा.खलील सय्यद सर कार्याध्यक्ष जिल्हा काँग्रेस (congress) कमिटी यांचा तालुका काँग्रेस कमिटी कळंबच्या वतीने जाहीर सत्कार.

प्रा.खलील सय्यद सर कार्याध्यक्ष जिल्हा काँग्रेस (congress) कमिटी यांचा तालुका काँग्रेस कमिटी कळंबच्या वतीने जाहीर सत्कार.

कळंब, उस्मानाबाद: आज रविवार रोजी उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस (congress) कमिटीचे कार्याध्यक्ष प्रा.सय्यद खलील सर यांचा कळंब तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार समारंभ करण्यात आला.

याप्रसंगी सय्यद सर बोलताना म्हणाले की, माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांना ही असामान्य जिम्मेदारी केवळ पक्षनिष्ठा, संघटन, या गोष्टींमुळे मिळाले आहे, व पक्ष वाढवण्यासाठी मी कळंब तालुक्यातील मोहागावचा च मूळ रहिवासी असून कळंब तालुक्याला जिल्हास्तरावरून झुकते माप देऊन सामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचे मी काम करीन.

त्याच बरोबर अल्पसंख्याक मुस्लिम समाजाने काँग्रेसच्या (congress) विचार धारेमध्ये येण्याचं आवाहन त्यांनी केले, व निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला बळ देण्यात येईल. असे याप्रसंगी त्यांनी म्हटले याचबरोबर तालुक्यातील विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले, त्यामध्ये कळंब तालुकाध्यक्ष पांडुरंग तात्या कुंभार, युवक माजी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब शेळके माजी तालुकाध्यक्ष दीलीपशिंह देशमुख, काँग्रेसच्या महिला आघाडीच्या, ज्योती सपाटे व युवक विधानसभा अध्यक्ष भैय्या निरपळ यांनीही विचार मांडले.

त्याच बरोबर किसान सेलचे अध्यक्ष विलास करंजकर यांनीही विचार मांडले या कार्यक्रमासाठी प्रस्ताविक व सूत्रसंचालन कार्याध्यक्ष कळंब शहर सचिन गायकवाड यांनी केले याप्रसंगी तालुक्यातील विविध सेलचे पदाधिकारीही उपस्थित होते.

Congress Party

यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष शंकर नाना करंजकर, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष शहाजान भाई शिकलगार लतिफ तांबोळी, जिल्हा सरचिटणीस भूषण देशमुख, युवक शहराध्यक्ष ताहेर शेख, भटक्या विमुक्त जमातीचे शहराध्यक्ष राजेश पुरी, मागासवर्गीय शहर कोषाध्यक्ष चंदन भोसले, बबन होसळमल, नासर शेख, ओबीसी ता अध्यक्ष हरिभाऊ जाधव, सुलतान शेख, सत्तार भाई, सय्यद भाई, मागासव्गीय अध्यक्ष अजित खलसे, शिनगारे भय्या आदिंची उपस्थिती होती.