महाराष्ट्रत आज रविवारी CORONA वायरस संक्रमण चे 6,843 नवे रुग्ण, तर 123 जणांचा मृत्यू
रविवारी महाराष्ट्रात कोरोना (corona) विषाणूच्या संसर्गाचे 6,843 नवीन रुग्ण आढळून आल्यानंतर संक्रमित लोकांची संख्या ही 62,64, 922 वर वाढली आहे, तर कोविड-19 मधील 123 रूग्णांच्या मृत्यूबरोबर मृतांचा आकडा हा 1,31,552 झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली. विभागाच्या म्हणण्यानुसार, रविवारी संसर्गापासून बरे झाल्यानंतर 5,212 रूग्णांना रुग्णालयातून सोडण्यात आले असून, महाराष्ट्रात आतापर्यंत 60,35,029 लोक संसर्गमुक्त झाले आहेत. राज्यात सध्या 94,985 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
रविवारी मुंबईत संसर्गाची 364 नवीन प्रकरणे नोंदली गेली असून 10 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे विभागाने म्हटले आहे. यासह आतापर्यंत 7,34,118 लोकांना मुंबईत संसर्ग झाला आहे, तर या प्राणघातक विषाणूमुळे 15,837 रुग्णांचा मृत्यू ही झाला आहे.
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 2,02,536 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. राज्यात आतापर्यंत 4,68,46,984 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे.