नऊ विद्यार्थ्यांची यशस्वी घौडदौड : देशपातळीवर १९७वा क्रमांक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : भारत सरकारच्या नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस मार्फत घेतल्या जाणाऱ्या ग्रॅज्युएट फार्मसी अॅप्टिट्यूड टेस्ट (GPAT-2025) या राष्ट्रीय स्पर्धा परीक्षेत आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील नऊ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या यशामार्फत विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेतील यशाची परंपरा यावर्षीही यशस्वीपणे जपली आहे.
फार्मसी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेल्या या परीक्षेत सत्यम राठोड याने देशपातळीवर १९७वा क्रमांक पटकावला आहे. याशिवाय कौशल जाधव, रुचिका बोरकर, प्रियांका शर्मा, साक्षी चव्हाण, वैष्णवी दणके, जयदीप जेजुरकर, नियती पवार आणि गायत्री सोनवणे या विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले असल्याचे पालकांनी अभिप्रेत केले आहे.या परीक्षेच्या तयारीदरम्यान प्रा. डॉ. पवनकुमार वानखडे यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.
तसेच बाह्य मान्यवर आणि माजी विद्यार्थ्यांचाही मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचा डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी असोसिएशनतर्फे सत्कार करण्यात आला.
या उपक्रमासाठी असोसिएशनच्या सचिव प्रा. डॉ. शुभांगी दसवडकर यांनी विशेष पुढाकार घेतला. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संकुल संचालक रिअर ॲडमिरल अमित विक्रम (नि.) व प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच संस्थेचे विश्वस्त तेजस पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे विशेष कौतुक केले.
