अध्यक्षपदी प्रदीप साठे, कोषाध्यक्षपदी नितीन साठे यांची सर्वानुमते निवड
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त भूम शहरात भव्य सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या अनुषंगाने शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या समितीच्या बैठकीत प्रदीप अनंत साठे यांची अध्यक्षपदी, तर नितीन पांडुरंग साठे यांची कोषाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
या बैठकीत अन्नधान्य वाटप, रक्तदान शिबिर, गरजू विद्यार्थ्यांना वह्या-दप्तर वाटप, वृक्षारोपण यांसारख्या विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. सामाजिक कार्याच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा जागर करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
बैठकीत सर्वानुमते निवड झालेली नवीन कार्यकारिणी पदी अध्यक्ष प्रदीप अनंत साठे, उपाध्यक्ष सचिन महादेव साठे, कोषाध्यक्ष नितीन पांडुरंग साठे, सचिव गणेश भाऊराव साठे
ही बैठक गौरीशंकर दगडू साठे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी गणेश गौरीशंकर साठे, राजू सर्जेराव साठे, प्रशांत अनंत साठे, ओंम गणेश साठे, अभिजीत साठे, आकाश साठे, लखन साठे, अभिमान श्रीरंग साठे, सागर गायकवाड, अजित गायकवाड, हरी भगवान लोंढे आदी अनेक समाजबांधव उपस्थित होते.
