महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भुम : श्री क्षेत्र धानोरी येथून पंढरपूरकडे प्रस्थान झालेल्या माऊलींच्या पायदळ वारीतील पालखीचे आज भूम शहरात आगमन झाले. यावेळी नगराध्यक्ष विकासरत्न मा. श्री. संजय नाना गाढवे यांनी पालखीचे मनोभावे दर्शन घेतले.
ही पालखी भूम शहरातील माळी संघटनेचे अध्यक्ष बालाजी माळी व उद्योजक दीपक माळी यांच्या निवासस्थानी पोहोचली होती. त्या वेळी नगराध्यक्षांसह अनेक मान्यवर आणि भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने उपस्थित होते.
यावेळी युवा उद्योजक श्री वरवडे, बालाजी माळी, दुर्गेश तोडकरी यांच्यासह इतर श्रद्धावानांनी उपस्थित राहून माऊलींच्या दर्शनाचा लाभ घेतला. वातावरणात ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषांनी भक्तिमय उत्साह निर्माण झाला होता.
