मा. नगराध्यक्ष संजय नाना गाढवे यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भुम : शहरातील समर्थ नगर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात आगमन झालेल्या संत श्री बाळू मामा यांच्या पालखीचे पूजन व महाआरती मंगळमय वातावरणात संपन्न झाली.
सदर पालखीचे पूजन मा. नगराध्यक्ष विकासरत्न संजय नाना गाढवे व नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी श्रींची महाआरती भक्तिभावाने पार पडली.
महाआरतीनंतर शहर व ग्रामीण भागातून आलेल्या सर्व भाविक भक्तांना संजय नाना गाढवे यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी पालखी क्र. ९ चे कारभारी आप्पा माळी यांच्या हस्ते संजय नाना गाढवे यांचा मानाच्या घोंगडीने सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास सर्व मान्यवर, पालखी सोहळ्याचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.
