राहुल भैय्या मोटेंच्या नेतृत्वात १५ उमेदवार बिनविरोध
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : कै. आमदार महारुद्र बप्पा मोटे शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ने शिवाजी खरेदी-विक्री संघ भूमच्या पंचवार्षिक निवडणुकीत (2025 ते 2030) एकहाती वर्चस्व सिद्ध केले आहे. माजी आमदार राहुल भैय्या मोटे यांच्या नियोजनातून आणि नेतृत्वाखाली १५ पैकी १५ उमेदवार बिनविरोध निवडून आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष हनुमंत पाटोळे यांनी सांगितले की, “संघावर सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे आणि संघाचे बहुतांश सभासद हे पक्षनिष्ठ आहेत. उत्तम नियोजन, कार्यकर्त्यांची एकजूट आणि मतदारांचा विश्वास यामुळेच हे यश शक्य झाले.”
या संघामध्ये एकूण ५११ सभासद आहेत. त्यामध्ये वैयक्तिक मतदार ४५९, विकास सोसायटी ३५, आणि इतर सहकारी संस्था १७ इतके मतदार नोंदवले गेले होते. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये सुरेश भोरे, विजयकुमार बोराडे, रवींद्र पवार, सुशांत जाधव, हिरालाल ढगे, रमेश मस्कर, राजेंद्र गाढवे, प्रवीण खटाळ, प्रकाश शेळके, शहाजी दराडे, श्रीराम खंडागळे,
गौरीशंकर साठे, सतीश सोन्ने, वर्षा नलवडे, वसुधा यादव हे उमेदवार असून. हनुमंत पाटोळे, तात्या दराडे, मधुकर मोटे, नानासाहेब पाटील, तात्यासाहेब गोरे, खैरे आबा या दिग्गज कार्यकर्त्यांसह माजी आमदार राहुल भैया मोटे यांनी हा पॅनल बिनविरोध काढण्यासाठी परिश्रम घेतले. विजयी उमेदवारांचे माहनंद डेअरीचे संचालक रणजीत दादा मोटे यांनी सत्कार केला.
