आवृत्ती पुणे

टेम्पो रिव्हर्स घेताना झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल पुणे : महाराष्ट्र ३६०न्यूज नेटवर्क आंबेगाव बुद्रुक येथे टेम्पोचालक टेम्पो रिव्हर्स घेत असताना पादचाऱ्याला धक्का लागून अपघात झाला. या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटनी शुक्रवारी (दि. १०) नवलेब्रिजकडून कात्रज चौकाकडे जाणाऱ्या बायपास मार्गावर आंबेगाव बुद्रुक येथे घडली. भरतकुमार प्रसाद (वय २६, रा. धनकवडी) असे … Read more

धायरीमध्ये ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राची चोरी

सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : दुचाकीवरील चोरट्यांनी डाव साधला पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क गर्दी आणि निर्जन मनुष्यवस्तीच्या ठिकाणी चोरट्यांनी मोबाईल आणि मंगळसूत्राची चोरी करणाऱ्यांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. ज्येष्ठ महिला भाजीपाला खरेदी करण्यासाठी जात होती. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमतीचे … Read more

बंद फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप उचकटून साडेतीन लाखाची चोरी

शिवणे येथील श्री कॅम्प्लेक्समधील प्रकार पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क शिवणे येथील श्री कॉम्प्लेक्समधील फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप उचकटून चोरट्यांनी एक लाख १२ हजार रुपये रोख आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण तीन लाख ४९ हजार ९४ रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. दि. ८ सप्टेंबर रोजी रात्री १० ते ९ सप्टेंबर सकाळी ११ दरम्यान ही घटना … Read more

महिलेचे ‘न्युड’ फोटो फेसबुकवर ‘व्हायरल’ करुन ‘बदनामी’

स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : गाझीयाबादच्या तरुणाने ब्लॅकमेल करून केलं ‘हे’ कृत्य पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क कोल्हापूर येथील एका महिलेबरोबर शरीरसंबंध ठेवुन त्याचे न्युड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन उत्तर प्रदेशातील गाझीयाबादच्या एका तरुणाने महिलेवर वारंवार बलात्कार केला. त्यानंतर आता ते न्युड फोटो व व्हिडिओ फेसबुकवर टाकून महिलेची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर … Read more

आंतरराष्ट्रीय पेंटिंग व्यवहारात व्यावसायिकाला 4.5 कोटींना गंडा

मुंढवा पोलिसांत तक्रार : जेरार्ड मार्टी यांच्याबरोबर केटीएमएस कंपनीचे ७-८ व्यवहार पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क आंतरराष्ट्रीय पातळीवर मौल्यवान पेंटिंगच्या खरेदी व्यवहारात नायजेरियन सायबर चोरट्यांनी ई मेल हॅक करुन पुण्यातील व्यावसायिकाला तब्बल साडेचार कोटी रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुण्याच्या सहकारनगर परिसरातील एका 48 वर्षीय व्यावसायिकाने मुंढवा पोलिसांना फिर्याद दिली … Read more

रविंद्र बऱ्हाटेला फरार कालावधीत आश्रय देणाऱ्या वकिलाला जामीन

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क एक वर्षाहून अधिक काळ फरार असलेला माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बऱ्हाटे याला आश्रय दिल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी अटक केलेल्या वकिलाला मोक्का न्यायालयाने 15 हजार रुपयांचा जामीन दिला आहे. अंतर्गत तपासासाठी त्याच्या ताब्याची गरज नाही, असा निष्कर्ष काढत विशेष न्यायाधीश एस.आर.नावंदर यांनी हा आदेश दिला. ॲड. सागर संजय म्हस्के ( वय … Read more

ससूनमधून तीन महिन्याच्या बाळाचे अपहरण करणारी तोतया परिचारिका तासात जेरबंद

बंडगार्डन पोलिसांनी तत्पर तपास करून बाळाला मातेकडे दिले पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क ससून रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेकडील एका तीन महिन्याच्या मुलीला परिचारिकेचा गणवेश घालणाऱ्या महिलेने गुरुवारी (दि. 9) पळवून नेले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्पर तपास यंत्रणा राबवून खराडी रस्त्यावर तोतया परिचारिका महिलेला ताब्यात घेऊन बाळाला सुखरूप मातेकडे सोपवले. मूल होत … Read more

सोने घेऊन पसार झालेल्या बंगाली कारागिराच्या पश्चिम बंगालमध्ये जाऊन आवळल्या मुसक्या

फरासखाना पोलीस स्टेशनची कामगिरी : ४०० ग्रॅम वजनाचा साडेसोळा लाखांचा ऐवज जप्त पुणे : महाराष्ट्र न्यूज ३६० नेटवर्क सोने घेऊन पसार झालेल्या बंगाली कारागिराच्या पश्चिम बंगालमध्ये जाऊन मुसक्या आवळण्यास फरासखाना पोलीस स्टेशनला यश आले असून, त्याच्याकडून ४०० ग्रॅम वजनाचा साडेसोळा लाखांचा ऐवज जप्त केला आहे. रविवार पेठ पुणे येथील सोन्याच्या मार्केटमधून ५७८ ग्रॅम ७२० मिलीग्रॅम … Read more

गणेशोत्सव काळात ज्वालाग्राही पदार्थांवर बंदी

पोलीस आयुक्त गुप्तांकडून आदेश जारी : आगीचा लोळ/ दिवे/ फुगे सोडण्यास मनाई पुणे : महाराष्ट्र न्यूज ३६० नेटवर्क गणेशोत्सव काळात कलम १४४ अन्वये पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ज्वालाग्राही पदार्थांवर बंदीचे आदेश दिले असून, आगीचा लोळ/दिवे/फुगे सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. गणेशोत्सव काळात काही तरुण उत्साहाच्या भरात सार्वजनिक ठिकाणी आगीचा लोळ निर्माण करणे / हवेत … Read more

नऊ लाखांची खंडणी स्वीकारताना गुन्हेगारास रंगेहाथ पकडून अटक

खंडणी विरोधी पथक दोनची कामगिरी : बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज पोलीस अभिलेखावरील गुन्हेगारास नऊ लाख रुपयांची खंडणी स्वीकारताना रंगेहाथ पकडून अटक करण्यात खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा, पुणे शहरला यश मिळाले असून, सदर आरोपीविरोधात बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार अनिकेत किशोर अहिवळे (रा. एल.आय.जी. … Read more