आवृत्ती पुणे

बनावट चेकद्वारे आर्थिक फसवणूक करणारे जेरबंद

सहकारनगर पोलिसांकडून पर्दाफाश : लाखो रुपयांचे घबाड उघड महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : बनावट चेकद्वारे शासनाची आर्थिक फसवणूक करणाऱ्या पाच सराईत गुन्हेगारांचा सहकारनगर पोलिसांकडून पर्दाफाश करण्य़ात आला असून, लाखो रुपयांचे घबाड उघड झाले आहे.दि. २२ ऑक्टोबर रोजी दुपारी एकच्या सुमारास बँक ऑफ बडोदा शाखा सातारा रोड पुणे येथील बँकेत एक इसम आगरतळा महानगरपालिका आयुक्त … Read more

सराईत वाहनचोर जेरबंद

गुन्हे शाखा युनिट चारची कामगिरी : चोरीच्या तीन मोटारसायकली जप्त महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : सराईत वाहनचोरास जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट चारला यश मिळाले आहे. आरोपीकडून चोरीच्या तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, त्यास पुढील कारवाईकरिता आळंदी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.वाहनचोरी प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नाईक संजय आढारी यांना त्यांच्या … Read more

‘पिटा’ गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर

हिंजवडीमधील लॉजवर छापा टाकून दोन मुलींची केली होती सुटका महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने हिंजवडी येथील क्लाऊड नाइन, ओयो लॉजमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला होता. या कारवाईत पोलिसांनी एकाला अटक करुन दोन मुलींची सुटका केली होती. या गुन्ह्यातील आरोपी मंगेश सुर्यवंशी (रा. उदगीर, जि. लातूर) याला … Read more

डाळींब पॅकिंगवरुन तरुणावर तलवारीने वार करणारे पाच जेरबंद

मार्केटयार्ड पोलिसांत सहा जणांवर गुन्हा : आंबेडकरनगर येथे रविवारी पहाटे घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मार्केटयार्डमध्ये डाळींब पॅकिंगच्या कामावर आलेल्या तरुणाला तुमच्यामुळे आमच्या मुलांना रोजगार मिळत नाही, असे म्हणून तलवारीने वार करुन जीवे मारण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी ६ जणांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पाच जणांना अटक केली … Read more

न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी ! अल्पवयीन मुलीवर बलात्कार

मार्केटयार्ड पोलिसांत एकावर गुन्हा : फोटो डिलिट करण्यासाठी मागितली 1.70 लाख रुपयांची खंडणी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : इंस्ट्राग्रामवर मैत्री करुन त्यातून प्रेमसंबंध निर्माण करुन एका अल्पवयीन मुलीला फसवून तिचे न्यूड फोटो पाठविण्यास सांगितले. त्यानंतर हे फोटो व्हायरल करायची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर फोटो डिलिट करायचे असेल तर 1 लाख 70 हजार … Read more

30 वर्षीय तरुणाचा भल्या पहाटे खून करणारा जेरबंद

कोंढव्यातील घटना : कामावरून काढून टाकण्याची देत होता धमकी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मालकाला सांगून कामावरुन काढून टाकेल, अशी धमकी देणार्‍या तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन त्याचा खून केल्याची घटना कोंढव्यात घडली असून, परिसरात खळबळ उडाली आहे. अमोल खडके (वय 30, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. कोंढवा पोलिसांनी आरोपी … Read more

जबरदस्तीने बुलेट घेऊन जाणाऱ्यास ठोकल्या बेड्या

येरवडा पोलिसांची कामगिरी : संगमवाडी येथे सापळा रचून घेतले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तू आमच्या गाडीला धडक देऊन नुकसान केले, भरपाई दे असे म्हणून जबरदस्तीने बुलेट घेऊन जाणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. जैदजमीर दलाल (वय २०), कासिम आसिफ अन्सारी (वय १९), यश कुंदन वारे (वय १९, रा. तिघेही गंजपेठ, पुणे) असे अटक केलेल्या … Read more

3 वर्षात पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने 5 कोटींना गंडा

नोव्हेंबर २०१५ मध्ये पैसे ट्रान्स्फर केले होते : दोन कंपन्यांच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तीन वर्षांमध्ये पैसे दुप्पट करुन देण्याचे आमिष दाखवून कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये पैसे ट्रान्स्फर केले होते. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी व्हेंचर इंडिया एल एल … Read more

वाळू व्यावसायिक संतोष जगतापचे खुनी ३० तासांत जेरबंद

गुन्हे शाखेच्या युनिट-६ची कामगिरी : उरुळीकांचन येथे भरदिवसा केला होता गोळीबार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : उरळी कांचन येथील हॉटेल सोनाईसमोर वाळू व्यावसायिक संतोष जगताप यांच्यावर दिवसाढवळ्या गोळीबार झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला, तर अंगरक्षक गंभीर जखमी झाला होता. त्याबाबत लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये २२/१०/२०२१ रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हयाच्या समांतर तपासाची चक्रे गुन्हे शाखेमार्फत … Read more

सावत्र मुलाचा खून करणाऱ्या बापाला तीन तासांत ठोकल्या बेड्या

बारामती शहर पोलिसांची कामगिरी : खून करून जवळच झाडीत लपला होता आरोपी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घरगुती भांडणातून बापाने सावत्र मुलाचा कोयत्याने सपासप वार करुन खून केला. ही घटना पारवडी (ता. बारामती, जि. पुणे) येथे घडली आहे. बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने वनविभागाच्या झाडीत लपलेल्या बापाला तीन तासांत बेड्या ठोकल्याची माहिती … Read more