लातुरची कन्या पुजा कदम हिने UPSC परिक्षेत्र उत्तीर्ण झाल्याबद्दल तुळजापूर येथे मनसे तर्फे सत्कार.

लातुरची कन्या पुजा कदम हिने UPSC परिक्षेत्र उत्तीर्ण झाल्याबद्दल तुळजापूर येथे मनसे तर्फे सत्कार.
उस्मानाबाद: लातुर जिल्हा औसा तालुक्यातील मौजे टाका या गावची सुकन्या पुजा अशोकराव कदम हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परिक्षेत घवघवीत यश संपादन केले, पुजाने मिळवलेले यश हे आकाशाला गवसणी घालणारे असून या मिळालेल्या यशामुळे लातूरची नव्हे तर संपूर्ण मराठवाड्याची शान आणि मान संपूर्ण देशभर उंचावलेली आहे.
यु. पी. एस. सी. ची (UPSC) परिक्षा सन २०२० मधून ती ही १५% दृष्टी असताना हे यश संपादन करणे तितके सोपे नव्हते. पुजाची जिल्हाधिकारी पदी निवड झाल्याने आज दि. २६ सप्तेंबर २०२१ रोजी तिचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व श्री तुळजा भवानी मातेची प्रतिमा धाराशिव मनसेचे जिल्हा संघटक तथा श्री तुळजा भवानी भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांच्या हस्ते तर प्रमुख उपस्थिती औसा मनसेचे तालुकाध्यक्ष शिवकुमार नागराळे, माजी सभापती पंचायत समिती औसा तथा शिवली पंचायत समिती सदस्या सौ. रेखाताई नागराळे, तुळजापूर मनसे शहराध्यक्ष प्रमोद कदम, तालुका संघटक उमेश कांबळे देऊन सत्कार करण्यात करण्यात आला व यापुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.