मंचकी निद्रेतून देविस सिंहासनावरती विराजमान करून घटस्थापनेने श्री तुळजा भवानी मातेचा नवरात्र महोत्सव प्रारंभ

मंचकी निद्रेतून देविस सिंहासनावरती विराजमान करून घटस्थापनेने श्री तुळजा भवानी मातेचा नवरात्र महोत्सव प्रारंभ.
परवेज मुल्ला, (तुळजापूर) उस्मानाबाद: आश्विन शु.१ शके १९४३ वार गुरूवार दि.०७ आक्टोबर २०२१ रोजी श्रीक्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजा भवानी मंदीरात पहाटे मोठ्या उत्साहात पारंपारिक पद्धतीने घोर निद्रेतून श्रीदेविची सिंहासनावरती पुनश्च प्रतिष्ठापना भोपे पुजा-यांकडून करण्यात आली.
त्यानंतर दुपारी १२ वाजता श्री तुळजा भवानी मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री कौस्तूभ दिवेगावकर व त्यांच्यासह पाळीचा मुख्य भोपे पुजारी सुरेश साहेबराव कदम परमेश्वर यांच्या हस्ते तसेच आमदार राणा पाटिल, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, तहसिलदार सौदागर तांदळे, जिल्हा परिषदसदस्या अर्चनाताई पाटिल, मंदिर व्यवस्थापक योगिता कोल्हेबाई, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, मंदीर सह व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतोले, जयसिंग पाटील, सेवेदारी महंत हमरोजीबुवा, तुकोजीबुवा यांच्या प्रमुख उपस्थितीत विधिवत घटस्थापना करण्यात आली.
ज्या ज्या काळात दैत्य रूपी दानवांनी मानवावरती अनाचार अत्याचाराच्या रूपाने थैमान घातले त्या त्या वेळी आदिशक्तीने दुर्गारूपातील विविध अवतार घेऊन या अत्याचारातून मुक्तता करून दिलेली आहे. म्हणून नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना करण्याचे दिवस होय.संपुर्ण भारतभर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात हा दुर्गा महोत्सव साजरा केला जात असतो. शरद ऋतूमधील अश्विन शु।। प्रतिपदे पासून नवमीपर्यंत केला जाणारा नवरात्र महोत्सव हा विशेष लक्षणीय मानला जात असतो.
कारण श्री दुर्गासप्तशती ग्रंथातील ‘शरत्काले महापुजा क्रियते या च वार्षिकी।।'(१२.१२) ह्या मंत्रानुसार देवीनेच ह्या शारदीय नवरात्र महापुजेचे महत्व निर्धारित केलेले आहे. शारदीय नवरात्र महोत्सव संपुर्ण भारतातील बहुतेक कुटुंबांत कुळधर्म स्वरूपात संपन्न होत असतो. हा महोत्सव नऊ दिवसांचा असल्यामुळे त्यास नवरात्र असे संबोधले जाते. या काळात संपन्न होणारी दुर्गापुजा आपापल्या कुलस्वामिनीच्या (उदाहरणार्थ – तुळजा भवानी, सप्तश्रृंगी, महालक्ष्मी, एकविरा, कामाक्षी, रेणुका, येडाई) स्वरूपांत केली जाते.
नवरात्रात नंदादीप, घट, पुष्पमाला, व बीजारोपण (शेत) ह्या चार महत्वाच्या गोष्टी असून त्या कोणत्या ना कोणत्या तरी तत्वाचे द्योतक आहे. त्या अनुषंगाने नंदादीप हे ज्ञानमयी देवीचे, घट हे आपल्या नाशवंत देहाचे, घटातील जल हे त्यातील चैतन्याचे, पुष्पमाला हे सत्कार्याने सुगंधीत झालेल्या मानवी जीवनसुत्राचे,तर बीजारोहण हे नवनिर्मितीचे प्रतिक आहे. ह्या सर्वांच्या समन्वयाचे गुढार्थाच्या दृष्टीकोनातून समालोचन केल्यास त्यामध्ये एक उदात्य हेतू, संकल्पना दिसून येतो कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती कमीतकमी पुजारी, मानकरी व सेवेदारी समवेत आई राजा उदो उदोच्या जय घोषात आणि संबळाच्या साथीने सर्व धार्मिक पुजाविधी करण्यात आल्या.
सर्वप्रथम घटकलशाची पारंपारीक पद्धतीने पुजा करून देविच्या मुख्य सिंहाच्या गाभा-यात, खंडोबा मंदीर, यमाईदेवी, टोळभैरव आणि आदिशक्ती आदिमाया या तुळजा भवानी मंदीरात जिल्हाधिकारी व पाळीचा भोपे पुजारी यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. यावेळी भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, सुधीर कदम, संजय परमेश्वर, अजित परमेश्वर दिनेश परमेश्वर, अवि मलबा, सचिन कदम, समाधान कदम, विनोद सोंजी, अतुल मलबा, संजय सोंजी, प्रशांत सोंजी, सचिन पाटील, जगदीश पाटील, सुहास भैय्ये, विनोद सोंजी, प्रशांत सोंजी, बाबासाहेब मलबा, शशीकांत कदम, शिवाजी कदम, क्रांती कदम, आण्णासाहेब सोंजी, गणेश परमेश्वर, दिग्विजय पाटिल, जगदिश पाटिल, संकेत पाटिल, अनेक मंदीर कर्मचारी पोलीस प्रशासन आदी उपस्थित होते.