महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सामाजिक कार्यकर्ते गिरीश खुशालचंद सोळंकी यांचे 75 वे रक्तदान करून समाजापुढे आदर्श ठेवला आहे.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. कारण त्यामुळे रुग्णांनाजीवदान मिळते. सोळंकी हे नेहमीच गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्यामधे पुढाकार घेत असतात. ते रक्तदान शिबिरांचे अनेकदा आयोजन करत असतात.
त्यांनी आतापर्यंत 64 वेळा रक्तदान 3, वेळा प्लाजमा व 8 वेळा प्लेटलेटस (SDP) दान केले आहे. सामाजिक क्षेत्रात त्यांना श्री रक्ताचे नाते ट्रस्टचे राम बांगड व सिद्धी फाउंडेशनचे ललित जैन (शिंगवी) यांचे मार्गदर्शन लाभत असते. करोना काळामध्ये त्यांनी अनेक रुग्णांना प्लाजमा व रक्त उपलब्ध करून दिले आहे..राम बांगड त्यांना रक्तदानाचे ” देवदूत” संबोधतात.