श्री. युनूस पठाण पुन्हा धावले मदतीला; एका कुटुंबाला अंधकारातून नेले प्रकाशाकडे…

श्री. युनूस पठाण पुन्हा धावले मदतीला; एका कुटुंबाला अंधकारातून नेले प्रकाशाकडे…
थेरगाव: थेरगाव, पिंपरी-चिंचवड परिसरातील संत ज्ञानेश्वर कॉलनी मधील रहिवासी श्री. अशोक कावळे यांचे महावितरण विभागाने तोडलेले वीज कनेक्शन पुन्हा जोडून देण्यासाठी समाजसेवक श्री. युनूस पठाण पुन्हा एकदा गरजू वक्तीच्या मदतीला धावले आणि त्या कुटुंबाला अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जाण्यासाठी एक मोठे सहकार्य आज केले आहे.
प्र. क्र. 23 धनगर बाबा मंदिर च्या मागे संत ज्ञानेश्वर कॉलनी मधील रहिवासी श्री. अशोक कावळे यांचा श्री. युनूस पठाण यांना फोन आला, की भाऊ आम्ही थोडे अडचणीमध्ये आहोत आपल्या मदतीची आम्हाला खूप गरज आहे, असा फोन येताच क्षणी श्री. युनूस पठाण यांनी कुठल्याही क्षणाचा विलंब न करता त्या ठिकाणी पोहोचले.
पोहचल्यावर तेथील घडलेला सर्व प्रकार समझून घेतला, श्री. अशोक कावळे हे गेल्या सहा वर्षापासून त्यांच्या कुटुंबियासह वीज पुरवठा खंडीत असल्या मुळे अडचणीत होते. ६ वर्षांपूर्वी त्यांच्या घरी वीज मीटर आणि इलेक्ट्रिसिटी काँक्शन असता त्यांना ५९०० रु इतके बिल आले होते. मात्र त्यांची परिस्थिती अत्यंत नाजुक असल्यामुले ते सदर बिल हे भरू शकले नाहीत, म्हणून त्यांचा वीजपुरवठा हे त्या वेळी खंडित करण्यात आला होता.
सध्या हे कुटुंब थेथे राहत असलेल्या ठिकाणी भाड्याचेही पैसे भरू शकत नसल्या कारणाने सदर विजधारकांनी त्यांचं वीज कनेक्शन कट केले होते. या सर्व गोष्टी युनुस पठाण यांच्या लक्षात येताच त्यांनी सदर कुटुंबाचे कागदपत्र घेऊन जवळील वीज कनेक्शन विभागांमध्ये जाऊन तेथील संधित अधिकाऱ्यांशी भेटून विषयावर चर्चा केली व काही दिवसातच सदर कुटुंबाला अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन गेले.