थेरगांव मधील ज्येष्ठ नागरिक तसेच तरुणाच्या आग्रहामुळे निवडणूक लढवणार, कोरोना योद्धा युनूस पठाण यांची माहिती

युनूस पठाण

थेरगांव मधील ज्येष्ठ नागरिक तसेच तरुणाच्या आग्रहामुळे निवडणूक लढवणार, कोरोना योद्धा युनूस पठाण यांची माहिती

पिंपरी-चिंचवड: नुकत्याच जाहीर झालेल्या पिंपरी-चिंचवड शहराच्या निवडणूक आराखडा नुसार पिंपरी-चिंचवड शहरात मध्ये 139 वार्ड अहिर करण्यात आलेले आहेत, त्या नुसार वार्ड क्रमांक. 34 थेरगाव या वॉर्डातून माननीय युनूस पठाण यांनी ना जातीचा ना पातिचा हा विचार न करता कोरोना काळामध्ये सर्वसामान्यांच्या कठीण प्रसंगी त्यांनी केलेले काम सर्व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये ज्ञात आहे.

कोविंड योद्धा म्हणून सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडात त्यांचे नाव आहे, युनूस पठाण असे एक व्यक्तिमत्त्व आहे जे कोरोना‌ सारख्या महामारी च्या काळात सदैव जनतेच्या संपर्कात राहुन कोरोना रुग्णांची सेवा केली.

Also read: कोविंड योद्धा युनूस पठाण यांची परत एक कौतुकास्पद कामगीरी.

त्यांनी 95 ते 100 कोरोना मुळे मृत्यू झालेल्या विविध धर्माच्या रिती-रिवाजानुसार मयत बॉडीचे अंत्यसंस्कार केले, कोरोना मधील कोणतेही काम असो युनूस पठाण यांनी कोणत्याही प्रकारे अशा अपेक्षा न बाळगता निस्वार्थ भावनेने समाजसेवा केली. युनुस पठाण यांनी सर्वसामान्य घरामध्ये जन्म झाल्यामुळेल सर्वसामान्य कष्टकरी लोकांच्या अडचणी त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये अनुभवल्यामुळे त्यांना सर्वसामान्य च्या प्रश्नाची जाण आहे.

थेरगाव मधील अनेक गरीब कुटुंबाला युनूसभाऊ पठाण यांनी अंधारातून प्रकाशाकडे नेत वीज कनेक्शन करून दिले, तसेच वार्डमधील ड्रेनेज लाईन ची तक्रार नेहमी त्यांच्याकडे येत असताना सदरील प्रकरणाचा छडा लावून स्वतः जातीने लक्ष देऊन हा प्रश्न त्यांनी कायमचा निकालात काढला.

वार्डातील गंभीर प्रश्न आरोग्याचा प्रश्न त्यांनी मार्गी लावले. वार्डातील कोणतेही प्रश्न असू द्या वार्डातील कोणत्याही समाजातील व्यक्तींनी त्यांच्याकडे आपले प्रश्न घेऊन गेल्यास त्यांनी समाधानकारक उत्तर देऊन त्यांच्या कामांना प्रथम प्राधान्य देण्यात आले, आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावले .युनूस पठाण नागरिकांच्या मना मनामध्ये त्यांच्या कामाचा दाखला दिसून येतो.

Also read: युनुस भाऊ पठाण युवा मंच यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त गरजूना छत्री वाटप.

असे व्यक्तिमत्व म्हणजे युनूस पठाण ज्या कोरोना सारख्या महामारी च्या काळामध्ये वार्डातील चार नगरसेवकांपैकी एकही नगरसेवक जनतेच्या कामे आला नसताना कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता नागरिकांना अन्नपुरवठा व दैनंदिन जीवनासाठी लागणारे किट उपलब्ध करून देणारा एकमेव कोविड योद्धा.फक्त सरकारच थेरगाव च नव्हे तर संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरांमध्ये त्यांनी कोरोना काळामध्ये नागरिकांच्या मदतीला धावून युनूस पठाण गेले.

याच प्रभागांमध्ये युनुस पठाणयांचे लहानपण थेरगाव मध्ये गेले असल्यामुळे त्यांची नाळ सर्वसामान्य नागरिकाची जुळलेली आहे, प्रभागातील तरुण ज्येष्ठ नागरिकाच्या आग्रहाखातर मी निवडणूक लढवत आहे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार साहेब यांच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्कार त्यांना देण्यात आला.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये असे एक व्यक्तिमत्व कोविड योद्धा म्हणजे युनुसभाऊ पठाण तसेच इतरही पक्षाच्या सन्माननीय व्यक्तींकडून व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांकडून त्यांना कोविड योद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

Also read: श्री. युनूस पठाण पुन्हा धावले मदतीला; एका कुटुंबाला अंधकारातून नेले प्रकाशाकडे…

होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये नागरिकांनी ठरवलंय कोणत्याही आमिषाला बळी न पडता निस्वार्थ भावनेने समाजसेवा केलेले .युनूस पठाण यांना सर्वसामान्यांची सेवा करण्या साठी महानगरपालिकेमध्ये पाठवण्याचा निर्धार केला आहे.