आवृत्ती पुणे

3 वर्षात पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने 5 कोटींना गंडा

नोव्हेंबर २०१५ मध्ये पैसे ट्रान्स्फर केले होते : दोन कंपन्यांच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तीन वर्षांमध्ये पैसे दुप्पट करुन देण्याचे आमिष दाखवून कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये पैसे ट्रान्स्फर केले होते. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी व्हेंचर इंडिया एल एल … Read more

महालक्ष्मीच्या मंदिरात दानपेटी व सोन्याचांदीच्या दागिन्याची चोरी

घोरपडी-डोबरवाडीतील घटना : शुक्रवारी रात्री ८ ते शनिवारी सकाळी ८च्या दरम्यान घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : डोबरवाडी (घोरपडी येथील श्री महालक्ष्मी प्रतिष्ठान मंदिरातील दानपेटीतून रोख दोन हजार आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला. ही घटना शुक्रवारी (दि. २२ ऑक्टोबर) रात्री ८ ते शनिवारी (दि. २३ ऑक्टोबर) … Read more

कंपनीतील 27 वर्षीय सहकारी तरुणीवर लैंगिक अत्याचार

पुण्यातील विमाननगरमधील घटना : वडगावशेरीतील तरुणीने चंदननगर पोलिसांत दिली फिर्याद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कंपनीत बरोबर काम करीत असलेल्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्यानंतर लग्न न करता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार डिसेंबर २०१५ ते २२ ऑक्टोबर २०२१ दरम्यान घडला आहे. किरण अशोक शिंदे (वय २९, रा. म्हाडा सोसायटी, … Read more

इंस्ट्राग्रामवर बनावट अकाऊंटद्वारे तरुणीने केली तरुणाची बदनामी

बिबवेवाडीतील तरुणीवर गुन्हा : उंड्रीतील तरुणाने कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये दिली फिर्याद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तरुणी, महिला यांच्या नावाने, सोशल मीडियावर बनावट अकाऊंट तयार करुन त्यांची बदनामी केली जात असल्याचे दिसून येते. मात्र, एका तरुणीने तरुणाच्या नावाचा व फोटोचा गैरवापर करुन बनावट अकाऊंट तयार करुन त्यांची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी … Read more

वाळू व्यावसायिक संतोष जगतापचे खुनी ३० तासांत जेरबंद

गुन्हे शाखेच्या युनिट-६ची कामगिरी : उरुळीकांचन येथे भरदिवसा केला होता गोळीबार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : उरळी कांचन येथील हॉटेल सोनाईसमोर वाळू व्यावसायिक संतोष जगताप यांच्यावर दिवसाढवळ्या गोळीबार झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला, तर अंगरक्षक गंभीर जखमी झाला होता. त्याबाबत लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये २२/१०/२०२१ रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हयाच्या समांतर तपासाची चक्रे गुन्हे शाखेमार्फत … Read more

सावत्र मुलाचा खून करणाऱ्या बापाला तीन तासांत ठोकल्या बेड्या

बारामती शहर पोलिसांची कामगिरी : खून करून जवळच झाडीत लपला होता आरोपी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घरगुती भांडणातून बापाने सावत्र मुलाचा कोयत्याने सपासप वार करुन खून केला. ही घटना पारवडी (ता. बारामती, जि. पुणे) येथे घडली आहे. बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने वनविभागाच्या झाडीत लपलेल्या बापाला तीन तासांत बेड्या ठोकल्याची माहिती … Read more

3 महिन्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी जन्मदात्रीच जेरबंद

येरवड्यातील घटना : अनैतिकसंबंधातून जन्मलेले बाळ ठरले खुनाचे कारण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अनैतिक संबंधातून जन्मलेल्या तीन महिन्याच्या मुलीचा आईनेच मुलाच्या मदतीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना येरवड्यात उघडकीस आली आहे. त्यानंतर १४ वर्षीय मुलाने तिला पिशवीत घालून नदीपात्रात फेकून दिले. याप्रकरणी महिलेला अटक करण्यात आली असून, अल्पवयीन मुलाला येरवडा पोलिसांनी ताब्यात … Read more

रिक्षाचालकांनी ग्राहकांना देव मानून सेवा द्यावी

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता : माझी रिक्षा सुरक्षित रिक्षा-२०२१ स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रिक्षा प्रवास नागरिकांना सुरक्षित वाटला पाहिजे, एवढी विश्वासार्हता निर्माण केली, तर रिक्षाचालकांप्रती आदर भावना समाजामध्ये निर्माण होईल. त्यासाठी ग्राहक देवो भवो मानून सेवा देण्यासाठी रिक्षाचालकांनी एक पाऊल पुढे टाकून काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त … Read more

मुळशीतील गांजाची शेती उध्वस्त करून चौघे जेरबंद

अंमली पदार्थविरोधी पथक १ व २ ची कारवाई : ११ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मुळशी भागात गांजाची शेती उध्वस्त करून चौघांना अटक केली. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथक-१ व २ ने संयुक्त कारवाई करून ११ लाख ६३ हजार १०० रुपयांचा १७३ किलो ९७५ ग्रॅम गांजा जप्त केला.चेतन मारुती … Read more

पीडितेला आत्महत्येस प्रवृत्त करणारा सराईत जेरबंद

सहकारनगर पोलिसांची कारवाई : सहा महिन्यांपासून होता फरार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे – अल्पवयीन मुलीस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सराईत गुन्हेगारास सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा केल्यापासून आरोपी फरार होता.संदिप ऊर्फ सनी अरुण डाकले, (रा तळजाई वसाहत) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, दि.18/3/2021 रोजी सराईत गुन्हेगार संदिप ऊर्फ सनी अरुण डाकले … Read more