सहकारनगर पोलिसांची कारवाई : सहा महिन्यांपासून होता फरार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे – अल्पवयीन मुलीस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सराईत गुन्हेगारास सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा केल्यापासून आरोपी फरार होता.
संदिप ऊर्फ सनी अरुण डाकले, (रा तळजाई वसाहत) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, दि.18/3/2021 रोजी सराईत गुन्हेगार संदिप ऊर्फ सनी अरुण डाकले याचेविरुध्द पिडीत मुलीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबाबत सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हयाचा तपास करत असताना अंमलदार सागर शिंदे व प्रदिप बेडीस्कर यांना खबर मिळाली की, दाखल गुन्ह्यातील सहा महिन्यांपासुन फरार असलेला संदिप सुखसागर नगर येथे लपुन बसला आहे. त्यानूसार त्याला सापळा रचून अटक करण्यात आली.
पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई, पोलीस निरीक्षक युनुस मुलानी यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस अधिकारी सुधीर घाडगे पोलीस अंमलदार बापू खुटवड, सुशांत फरांदे, महादेव नाळे, भुजंग इंगळे, सागर सुतकर, महेश मंडलिक, सागर शिंदे व प्रदिप बेडीस्कर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
