आवृत्ती पुणे

टिंगरेनगरला कारच्या धडकेने वृद्धाचा मृत्य

विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव कारने धडक दिल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात टिंगरेनगर गल्ली नं.५ समई हॉटेलच्या गल्ली समोर विश्रांतवाडी एअरपोर्ट रोडवर १७ जुलै रोजी दुपारी घडला. या प्रकरणी या नागरिकाचा मुलगा योगेश ढोली याने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. भर दिवसा हा अपघात झाला. … Read more

शेअरच्या नफ्याचे आमिष दाखवुन ११ लाखाची फसवणूक

विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळू शकतो असे आमिष दाखवून तरुणाची ११ लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे शहरातील सदाशिव पेठेत राहणाऱ्या एका तरुणाला अनोळखीने मोबाईलवर संपर्क केला. शेअर्स ट्रेडिगचे … Read more

चाकूच्या धाकाने तरुणाचे १६ लाख केले ट्रान्स्फर

चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : चाकूचा धाक दाखवून तरुणाचे १६ लाख रुपये त्याच्या खात्यात जबरदस्तीने ट्रान्स्फर करण्याचा प्रकार बालेवाडी नजीक घडला आहे. या प्रकरणी तरुणाने दिलेल्या फिर्यादीनंतर चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.२२ जुलै रोजी रोजी थर्ड वेव्ह कॅफे समोर, हाय स्ट्रीट, बालेवाडी येथून … Read more

पायी जाणाऱ्या आंबेगावच्या नागरिकास लुटणारा अटकेत

भारती विद्यापीठ पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भारती विद्यापीठ पोलीसानी पायी चालणाऱ्या नागरीकास मारहाण करुन लुटणाऱ्या आरोपीस जेरबंद केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १४ जुलै रोजी फिर्यादी हे विजयलक्ष्मी फरसाणच्या गल्लीत राही स्मृती बंगला, आंबेगाव पठार पुणे येथुन त्यांच्या घरी पायी जात असताना दुचाकी गाडीवरुन येवुन त्यांना मारहाण करुन त्यांच्या खिशातील ९,३००/- रु … Read more

जयराज ग्रुपच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

तीनशे लोकांची मोफत आरोग्य तपासणी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जयराज ग्रुपचे संस्थापक कै. हिराभाई शाह (चोखावाला) यांच्या स्मृती दिनानिमित्त मार्केटयार्ड मधील काम करणाऱ्या हमाल व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये डोळे तपासणी, चष्मे वाटप व मोतीबिंदू शास्त्रक्रियेसाठी नोंदणी करण्यात आली. तसेच कुटुंबीयांसाठी ब्रेस्ट कॅन्सर तपासणी करण्यात आली. जयराज ग्रुप, रोटरी … Read more

भगवान महावीरांची अहिंसा अत्यंत सूक्ष्म स्तरावरची : साध्वी शिलापीजी

मुसळधार पावसातही प्रवचनातून अमृतधारांचा वर्षाव महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भगवान महावीर यांची अहिंसा समजून घ्यायला हवी. ती सूक्ष्म अहिंसा आहे. महात्मा गांधीजींनीसुद्धा अहिंसेचा स्वीकार केलेला होता. ते सत्याग्रह म्हणत असत. परंतु महावीरांच्या अहिंसेत कशाचाच आग्रह नाही. कारण आग्रह आहे तिथे हिंसा आहे. इतक्या सूक्ष्म पातळीवर त्यांनी अहिंसेचा विचार केलेला होता, असे प्रतिपादन साध्वी शिलापीजी … Read more

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा कुऱ्हाडीने घाव घालून खुन

लोणीकंद पोलिसांनी केली आरोपीला अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा डोक्यात घाव घालून खुन करणाऱ्या पतीस पोलिसांनी अटक केली आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत बुर्के गाव येथे ही खळबळजनक घटना घडली आहे. लक्ष्मी बाबासाहेब जाधव (वय ५०) असे खून झालेल्या पत्नीचे नाव … Read more

जबरदस्तीने दुचाकी नेल्याने बँकेच्या लोन रिकव्हरी एजंटला अटक

गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने खासगी बँकेच्या वाहन लोन रिकव्हरी एंजटवर कारवाई करून त्याच्याकडून बळजबरीने ताब्यात घेतलेली दुचाकी जप्त केली आहे. त्याच्यावर खंडणी वसूल केल्यामुळे गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. लोन वर घेतलेल्या गाड्यांच्या संदर्भात सर्व सामान्य नागरिकांना रिकव्हरी एंजट कडून … Read more

सुंदर आयुष्याचा अनादर करू नका : आचार्य चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठान मध्ये बहुमोल मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीवन जगत असताना प्रत्येक कर्म प्रेमाने करावे. सुंदर आयुष्य जगत असताना नेहमी आनंदी राहावे आणि आपल्या आयुष्याचा कधीही अनादर करू नये असे विचार आचार्य चंदनाजी यांनी आपल्या प्रवचनात मांडले. चातुर्मासानिमित्त वर्धमान प्रतिष्ठान येथे सुरू असलेल्या प्रवचनमालेत आचार्य चंदनाजी आणि साध्वी शिलापीजी यांनी आपले विचार मांडले. … Read more

सिध्दार्थ भोकरे बिझनेस टायटन्स पुरस्काराने सन्मानित

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई : रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स पुरस्कार संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्टिट्यूटला सुप्रसिध्द अभिनेता सोनू सूद यांच्याहस्ते अबुधाबी येथे प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सिध्दार्थ भोकरे यांना सन्मानित करण्यात आले. रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स हा भारतीय उद्योजकांच्या उत्कृष्टतेचा आणि नवोन्मेषाचा गौरव करण्यासाठी समर्पित एक प्रतिष्ठित उपक्रम आहे. भारतातील विविध क्षेत्रातील व्यवसायिकांना … Read more