आवृत्ती , पुणे

गुन्हेगारांकडून २ पिस्तूल, ४ जिवंत काडतुसे जप्त

दोघांना अटक : नांदेड सिटी पोलिसांची धायरीत कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून नांदेड सिटी पोलिसांनी दोघा गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडून १ लाख ६२ हजार रुपयांची २ पिस्तूल व ४ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अनिल प्रकाश लोहबंदे (वय २०, रा. निशिगंध सोसायटी, ऋतुनगरी फेज-२, बेनकर वस्ती, धायरी, पुणे) व वैभव महादेव पोळेकर … Read more

शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची एक कोटींची फसवणूक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची १ कोटी १४ लाख ६९ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कॅम्पमध्ये राहणाऱ्या एका ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार ३ नोव्हेंबर २०२५ ते ८ जानेवारी … Read more

मोबाईल प्रामाणिकपणे पोलिसांकडे जमा, यश कुंकूलोळ व स्वराज लोखंडे यांच्या तत्परतेमुळे मालकाला परत

सापडलेला मोबाईल स्वतःकडे न ठेवता पोलिसांच्या स्वाधीन : दोघांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : सायंकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास काही कामानिमित्त ४२२ परंडा रोड परिसरातून दुचाकीवरून जात असताना यश कुंकूलोळ व स्वराज लोखंडे या दोघांना रस्त्यावर एक मोबाईल पडलेला दिसला. मोबाईल स्वतःकडे न ठेवता त्यांनी तो बार्शी शहर पोलिस ठाण्यात जमा करून प्रामाणिकपणाचा … Read more

‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमावरून सीओईपीमध्ये राडा

काँग्रेस, अभाविप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची : काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमावरून सीओईपीमध्ये युवक काँग्रेस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी काँग्रेसच्या ५० ते ६० … Read more

लिओ लायन्स क्लब बार्शी टाऊन यूथच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १०४ रक्तदात्यांचे रक्तदान

एमआयटी कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्च – सहकार्याने आयोजन : ८० टक्के रक्तदाते प्रथमच रक्तदान करणारे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : लिओ लायन्स क्लब बार्शी टाऊन यूथ व एमआयटी कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात १०४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेष … Read more

राखीच्या एका धाग्याने जोडली मनांची नाती

व्हीटीपी ग्रुपमध्ये रक्षाबंधनाचा अनोखा उत्सव : प्रत्येक मनगटाला मिळाला आपुलकीचा स्पर्श महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : रक्षाबंधन म्हणजे केवळ राखी बांधण्याचा सण नाही, तर विश्वास, स्नेह आणि नात्यांना अधिक घट्ट करणारा भावनिक उत्सव आहे. याच भावनेला अनोख्या पद्धतीने साकारत व्हीटीपी ग्रुपच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी विशेष रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प. पू. डॉ. श्री. … Read more

८०व्या वाढदिवशी रमणलाल लुंकड यांची ‘हिरवी’ भेट!

ऋषी आनंदमध्ये वृक्षारोपण : १३ वर्षांपूर्वी लावलेली ४०० झाडे आज बनली निसर्गाची शान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : रमणलाल लुंकड यांनी ८० वर्षे पूर्ण करून ८१ व्या वर्षात पदार्पण केले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार, २० ऑगस्ट २०२६ रोजी ऋषी आनंद संस्थेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. हडपसर परिसरातील नाल्यालगतच्या पडीक सात एकर जागेत तेरा वर्षांपूर्वी उपाध्याय प. … Read more

मनातील नकारात्मकतेचे विषारी विचार दूर करा आणि आनंदी जीवन जगा : डॉ. बी. के. शक्तीराज

मनातील ताण, भीती, ईर्ष्या आणि नकारात्मक विचारांपासून मुक्त होण्याचा दिला संदेश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मनातील विषारी विचार दूर करून सकारात्मक विचारांची कास धरली, तर जीवन अधिक आनंदी आणि समाधानी होऊ शकते, असा प्रेरणादायी संदेश प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, माउंट आबूचे ख्यातनाम आंतरराष्ट्रीय मोटिव्हेशनल स्पीकर, विश्वविक्रम धारक आणि माईंड ट्रेनर डॉ. बी. के. शक्तीराज … Read more

शेठ बेचरदास मानचंद जैन ट्रस्टतर्फे ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

सेवकांच्या हस्ते ध्वजारोहण : दृष्टिहीन कलाकारांचे देशभक्तिपर गीतांनी मन जिंकले महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेठ बेचरदास मानचंद जैन ट्रस्टच्या वतीने जयराज भवन, शुक्रवार पेठ येथे देशाचा ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण व देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला संस्थेचे सदस्य तसेच मार्केट यार्ड येथील प्रसिद्ध चहा व्यापारी बिपीन माणेकलाल मेहता आणि आशाबेन बिपीन शहा प्रमुख अतिथी … Read more