Maharashtra Jain Warta
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती नकोत, बंदी घाला
हायकोर्टात जनहित याचिका दाखल, सरकारला नोटीस महाराष्ट्र न्युज नेटवर्क मुंबई : देवांच्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसपासून (पीओपी) बनविण्यावर बंदी घालण्याच्या आदेशावर अंमलबजावणी व्हावी, यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. याबाबत न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होती. पर्यावरणपूरक साहित्य … Read more
टोयोटा प्रकल्पासोबतच उभारणार कौशल्य विकास केंद्र
महाराष्ट्र न्युज नेटवर्क मुंबई : छत्रपती संभाजीनगरच्या ऑरिक औद्योगिक सिटीमध्ये मोटार गाड्यांच्या निर्मितीचा प्रकल्प उभारण्याबरोबरच टोयोटा किर्लोस्कर मोटर्स ही विख्यात कंपनी याच ठिकाणी कौशल्य विकास आधारित तांत्रिक संस्थादेखील उभारणार आहे. त्यातून तरुण-तरुणींना या आणि अन्य उद्योगांमध्ये रोजगार मिळविण्यासाठीचे प्रशिक्षण दिले जाईल. टोयोटा कंपनी आपल्या सीएसआर फंडातून या संस्थेची उभारणी करणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथे याप्रकल्पातून … Read more
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी को जीतो का आमंत्रण
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो अपेक्स की ओर से वाराणसी में 9 से 11 ऑगस्ट 2024 को समीक्षा का प्रोग्राम होने जा रहा है। इस प्रोग्राम के लिए उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी को प्रमुख अतीथि के रुप मे जीतो के राष्ट्रीय अध्यक्ष कांतिलाल ओसवाल और सेक्रेटरी मनोज मेहता इन्होंने आमंत्रित किया।
दुष्काळात पुरंदरच्या मुक्या जनावरांना मिळाला आधार
‘बीजेएस’ची यमाईशिवरी, वाल्हेची चारा छावणी ठरली वरदान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भारतीय जैन संघटना (बीजेएस) या सामाजिक संस्थेने यमाई शिवरी येथे दि. २८ एप्रिल, तर वाल्हे (ता. पुरंदर) येथे दि. १५ मे पासून प्रत्येकी ५०० जनावरांच्या क्षमतेची चारा छावणी उभी केली. १००० जनावरांच्या दोन चारा छावणीमुळे जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न तर मिटलाच, शिवाय पशुपालकांच्या चेहऱ्यावरची … Read more
मनू भाकरने नेमबाजीत जिंकले कांस्य : १२ वर्षांनी ऑलिम्पिक पदक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क पॅरिस : मागील टोकियो ऑलिम्पिकमध्ये मध्ये बिघडलेल्या पिस्तूलचे शल्य दूर करत भारताची युवा नेमबाज मनू भाकर हिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदकतालिकेची सुरूवात केली. १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम फेरीत २२ वर्षीय मनूने कांस्य पदकाची कमाई केली. मनू ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाजही ठरली. मनूच्या या शानदार कामगिरीसह ऑलिम्पिकमधील भारतीय … Read more
गुन्हेगारांचे धाबे दणाणले, पोलिसांना नवे अस्त्र
‘एआय’ सीसीटीव्ही कॅमेरे ठेवणार पाळत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शहरासह परिसरात गुन्हे करणाऱ्या, तसेच वाँटेड असलेल्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी शहरात लवकरच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स बेस (एआय) कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यामध्ये एआय आधारित ‘फेस रिकग्नायझेशन’ यंत्रणेमुळे शहरात दाखल झालेल्या सराईत गुन्हेगारांवर वचक ठेवण्यास मदत होणार आहे. तसेच गुन्हेगारांच्या संशयित हालचालींवर देखील पाळत ठेवली जाणार आहे. … Read more
जीपॅट परीक्षेत डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाचे यश
स्पर्धा परीक्षेतील यशाची परंपरा यावर्षीही कायम महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भुम : भारत सरकार द्वारे घेतल्या जाणाऱ्या जीपॅट-२०२४ या राष्ट्रीय स्पर्धा परीक्षेमध्ये आकुर्डी स्थित डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील दहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व याद्वारे स्पर्धा परीक्षेतील यशाची परंपरा यावर्षीही विद्यार्थ्यांनी कायम ठेवली आहे. फार्मसी शिक्षण क्षेत्राच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी ही परीक्षा अनिवार्य आहे. … Read more