पुण्यातील सहकारनगर पोलिसांत गुन्हा : पोलिस दलात प्रचंड खळबळ
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
ग्रामीण पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचार्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. महिला पोलिसानं आत्महत्या केल्याने पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील सहकारनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पूजा दत्तात्रय कांबळे (29, रा. धनकवडी, पुणे) असे आत्महत्या केलेल्या महिला पोलिसाचं नाव आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, पूजा कांबळे या पुणे ग्रामीण पोलिस दलात पोलिस कॉन्टेबल म्हणून दौंड पोलिस ठाण्यात कार्यरत होत्या. धनकवडी परिसरात त्या कुटुंबासह रहावयास होत्या. ज्यांचे कुटुंब एकत्र रहात होते. रविवारी रात्री दहाच्या सुमारास त्या त्यांच्या दुसर्या मजल्यावरील रूममध्ये गेल्या. त्या परत खाली न आल्याने त्यांच्या पतीने वर जाऊन पाहिले, तर दरवाजा बंद होता. बराचवेळ आवाज दिल्यानंतरही पूजा यांनी दरवाजा उघडण्यास प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी खिडकी उघडून पाहिले. मात्र, आतमधील काही एक दिसत नव्हते. दरम्यान, पूजा यांच्या पतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी पूजा यांनी गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. त्यांनी तातडीने पूजा यांना भारती विद्यापीठ हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रूग्णालयात पाठविण्यात आला. घरगुती वादातून पूजा यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पूजा कांबळे या सध्या रजेवर होत्या अशी माहिती ग्रामीण पोलिस दलातील सूत्रांकडून मिळाली आहे.