कोंढव्यातील साईनगरमधील घटना : पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांवर गुन्हा
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
कोंढव्यातील श्रीराम कॉलनी (साईनगर गल्ली नं.३)मधील फ्लॅट फोडून रोख रक्कम, सोन्याचे दागिने, गॅस सिलेंडर, गॅस शेगडी असा पाच लाख ४४ हजारांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला. ही घटना शनिवारी (दि. ४) रात्री १० ते रविवारी (दि. ५) सकाळी ८च्या दरम्यान घडली.
याप्रकरणी प्रवीण पाम्पूराम (वय २२, रा. साईनगर, कोंढवा बुद्रुक, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, कोंढव्यातील साईनगर गल्ली नं.३, श्रीराम कॉलनी येथील फ्लॅट शनिवारी (दि. ४ ऑगस्ट) रात्री १० ते रविवारी (५ ऑगस्ट) सकाळी आठच्या दरम्यान कुलप बंद होता. ही संधी साधून चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप उचकटून पाच लाख रुपये रोख, सोन्याचे दागिने आणि गॅस सिलेंडर, गॅस शेगडी असा एकूण पाच लाख ४४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
पुढील तपास कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील करीत आहेत.
















