डॉ. दत्ता कोहिनकर : लष्कर पोलीस स्टेशनच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना महामारीमुळे पोलिसांवर दैनंदिन जीवनामध्ये ताणतणावाची समस्या दिसून येत आहे. ताणतणावमुक्त जीवन जगण्यासाठी दररोज व्यायाम आणि ध्यानधारणा करण्याची गरज आहे, असे मत माइंड पॉवर ट्रेनर डॉ. दत्ता कोहिनकर यांनी व्यक्त केले.
लष्कर पोलीस स्टेशनच्या वतीने कामातील ताणतणाव कसा दूर करावा, याविषयी माईंड पॉवर ट्रेनर डॉ. दत्ता कोहिनकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ, कोहिनकर म्हणाले की, हजारो युद्ध जिंकणारा योद्धा सर्वश्रेष्ठ असतो. त्यामुळे लोकांनी मनाची सबलता वाढविण्यासाठी सकस आहार आणि ध्यान करत मन प्रसन्न ठेवले पाहिजे. प्रत्येक गोष्टीचे आकर्षण असते. मात्र, त्यासाठी तुम्ही जसा विचार कराल, तसेच तुम्ही व्हाल, त्यामुळे मनावर काही बंधने असणे आवश्यक आहे.
लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी प्रास्ताविक केले.
