अज्ञातावर गुन्हा दाखल : शिवाजीनगर खुडे ब्रिजखाली घडली घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : अनोळखी व्यक्तीचा धारदार व कठीण हत्याराने डोक्यात वार करून खून केल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना ८ सप्टेंबर २०२१ रोजी शिवाजीनगरमधील खुडे ब्रिजच्या खाली घडली.
शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अर्जुन सुभाष नाईकवाडे यांनी फिर्याद दिली असून, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आकस्मात मृत्यू झालेल्या व्यक्तीची चौकशी केली. त्यावेळी एका अनोळखी ४० वर्षांच्या व्यक्तीचा अज्ञाताने धारदार व बोथट कठीण हत्याराने डोक्याच्या उजव्या बाजूला कपाळावर, कानावर, तसेच गालावर, हनुवटीवर मारहाण करून गंभीर जखमी करून खून केल्याचे प्रथमदर्शनी तपासात उघडकीस आले आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक विक्रम गौड करीत आहेत.
