येरवड्यातील घटना : किरकोळ कारणावरून केली जबर मारहाण
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : किरकोळ कारणावरून पत्नीला जबर मारहाण करून जीवे मारणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली. २० जानेवारी २००८ साली त्यांचे लग्न झाले असून, तीन अपत्ये आहेत. ही घटना २१ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास लक्ष्मीनारायण येरवडा येथे घडली.
रोहित वाघमारे (वय २३, रा. अशोकनगर, येरवडा, पुणे) यांनी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीची बहीण जयश्री किशोर शिरसाठ हिचे रोहित वाघमारे यांच्याबरोबर २० जानेवारी २००८ रोजी लग्न झाले असून, त्यांना लहान मुले आहेत. पतीने किरकोळ कारणावरून भांडण करून डोक्यात, पाठीवर, छातीवर हाता-पायाने बेदम मारहाण करून तिचा खून केला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी घरातील पडलेले रक्त आरोपीने धुवून पुसून टाकले आहेत.
पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयसिंह चौहान करीत आहेत.
