• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 18, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

टिपू पठाण टोळीवर खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल

February 18, 2026
0
18 2 26 10
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

हॉटेल चालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून वर्षभर उकळली खंडणी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

पुणे : मोक्का लावलेल्या दोन गुन्ह्यांमध्ये एकामागून एक जामीन मिळाल्यानंतर गँगस्टर टिपू पठाण व त्याच्या टोळीवर खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सय्यदनगरमधील एका हॉटेलचालकाकडून तो गेल्या एक वर्षापासून दरमहा पाच हजार रुपये खंडणी उकळत होता.

याबाबत नवाज मोहम्मद तांबोळी (वय ५४, रा. गुलामअलीनगर, मोहम्मदवाडी) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी रिजवान ऊर्फ टिपू सत्तार पठाण (रा. ख्वाजा मंझिल, सय्यदनगर, हडपसर), तन्वीर शकील शेख (रा. सय्यदनगर, हडपसर), इरफान नासीर शेख (रा. हडपसर), अजित ऊर्फ अंट्या महमंद हुसेन शेख (रा. सय्यदनगर, हडपसर), सद्दाम सलीम पठाण (रा. सय्यदनगर, हडपसर) व इतर ३ ते ४ साथीदारांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १ जानेवारी २०२४ ते १२ जानेवारी २०२५ दरम्यान घडला.

टिपू पठाण व त्याच्या टोळीवर जमीन बळकावून ती भाड्याने देणे व जीवे मारण्याची धमकी देणे अशा दोन गुन्ह्यांमध्ये मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात न्यायालयाने नुकताच टिपू पठाणसह सहा जणांना जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर आता आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नवाज तांबोळी यांचे मोहम्मदवाडी येथील गुलामअलीनगरमध्ये ‘हॉटेल जमजम’ नावाचे हॉटेल आहे. ते गेली सात वर्षे हॉटेल व्यवसाय करीत आहेत. जानेवारी २०२४ मध्ये त्यांची ओळखीचा तन्वीर शेख हॉटेलमध्ये येऊन म्हणाला, “तुमचा धंदा चांगला चालला आहे आणि त्याचा नफा टिपू भाईला द्यावा लागेल, अन्यथा हॉटेल चालू देणार नाही,” अशी धमकी देऊन तो निघून गेला. त्यानंतर टिपू पठाणच्या टोळीतील सदस्य वारंवार येऊन खंडणीची मागणी करत होते.

११ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी तन्वीर शेख व इम्रान अफजल शेख हॉटेलमध्ये आले. त्यांनी टिपू पठाणला फोन करून फिर्यादीशी बोलायला दिले. त्यावेळी टिपू पठाणने दरमहा पाच हजार रुपये खंडणी देण्याची धमकी दिली.

१२ जानेवारी रोजी तन्वीर शेखने फिर्यादीस टिपू पठाणच्या कार्यालयात बोलावले. ख्वाजा मंझिल येथील कार्यालयात टिपू पठाण व त्याचे साथीदार उपस्थित होते. खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर टिपू पठाणने साथीदारांना “याचे हातपाय तोडून टाका,” असे सांगितले.

घाबरून फिर्यादीने तत्काळ पाच हजार रुपये दिले. त्यानंतर टोळीचे सदस्य हॉटेलमध्ये येऊन पैसे न देता जेवण करणे व पार्सल नेणे, तसेच दरमहा पाच हजार रुपये घेऊन जाणे सुरूच होते. व्यवसायाच्या भीतीने आतापर्यंत तक्रार दिली नव्हती, असे फिर्यादीने नमूद केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे तपास करीत आहेत.

पिस्तुल दाखवून धमकी
फिर्यादी कार्यालयात गेल्यावर टिपू पठाणने टेबलाच्या ड्रॉवरमधील पिस्तुल काढून हातात घेत “माझे ऐकले नाही तर गोळी घालीन,” अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने दरमहा पाच हजार रुपये खंडणी देण्याचा इशारा देत, “आमच्या टोळीतील कोणीही पैसे मागायला आला तर ठरल्याप्रमाणे रक्कम देत जा,” असे बजावले.

Feb 2026 1

Latest Articles

बार्शीतील बाजारपेठेतील रहदारीच्या ठिकाणावरून दुचाकी चोरी

बार्शीतील बाजारपेठेतील रहदारीच्या ठिकाणावरून दुचाकी चोरी

February 18, 2026
बुधवार पेठेतील ११ बांगलादेशी तरुणी ताब्यात

बुधवार पेठेतील ११ बांगलादेशी तरुणी ताब्यात

February 18, 2026
Abacus Academy राज्यस्तरीय स्पर्धेत बार्शीच्या जयश्री अबॅकसचा चमकदार यश

Abacus Academy राज्यस्तरीय स्पर्धेत बार्शीच्या जयश्री अबॅकसचा चमकदार यश

February 18, 2026
महिलेचा खून करून मृतदेह दरीत फेकणाऱ्या ६ जणांना अटक

महिलेचा खून करून मृतदेह दरीत फेकणाऱ्या ६ जणांना अटक

February 18, 2026
प्राईड इंग्लिश स्कूलचा ‘नृत्य रंग’ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

प्राईड इंग्लिश स्कूलचा ‘नृत्य रंग’ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

February 18, 2026
Load More
Previous Post

Abacus Academy राज्यस्तरीय स्पर्धेत बार्शीच्या जयश्री अबॅकसचा चमकदार यश

Next Post

बुधवार पेठेतील ११ बांगलादेशी तरुणी ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

बार्शीतील बाजारपेठेतील रहदारीच्या ठिकाणावरून दुचाकी चोरी

बार्शीतील बाजारपेठेतील रहदारीच्या ठिकाणावरून दुचाकी चोरी

February 18, 2026
बुधवार पेठेतील ११ बांगलादेशी तरुणी ताब्यात

बुधवार पेठेतील ११ बांगलादेशी तरुणी ताब्यात

February 18, 2026
टिपू पठाण टोळीवर खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल

टिपू पठाण टोळीवर खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल

February 18, 2026
Abacus Academy राज्यस्तरीय स्पर्धेत बार्शीच्या जयश्री अबॅकसचा चमकदार यश

Abacus Academy राज्यस्तरीय स्पर्धेत बार्शीच्या जयश्री अबॅकसचा चमकदार यश

February 18, 2026
महिलेचा खून करून मृतदेह दरीत फेकणाऱ्या ६ जणांना अटक

महिलेचा खून करून मृतदेह दरीत फेकणाऱ्या ६ जणांना अटक

February 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
बार्शीतील बाजारपेठेतील रहदारीच्या ठिकाणावरून दुचाकी चोरी

बार्शीतील बाजारपेठेतील रहदारीच्या ठिकाणावरून दुचाकी चोरी

February 18, 2026
बुधवार पेठेतील ११ बांगलादेशी तरुणी ताब्यात

बुधवार पेठेतील ११ बांगलादेशी तरुणी ताब्यात

February 18, 2026
टिपू पठाण टोळीवर खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल

टिपू पठाण टोळीवर खंडणीचा आणखी एक गुन्हा दाखल

February 18, 2026
Abacus Academy राज्यस्तरीय स्पर्धेत बार्शीच्या जयश्री अबॅकसचा चमकदार यश

Abacus Academy राज्यस्तरीय स्पर्धेत बार्शीच्या जयश्री अबॅकसचा चमकदार यश

February 18, 2026
महिलेचा खून करून मृतदेह दरीत फेकणाऱ्या ६ जणांना अटक

महिलेचा खून करून मृतदेह दरीत फेकणाऱ्या ६ जणांना अटक

February 18, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

बार्शीतील बाजारपेठेतील रहदारीच्या ठिकाणावरून दुचाकी चोरी

बार्शीतील बाजारपेठेतील रहदारीच्या ठिकाणावरून दुचाकी चोरी

February 18, 2026
बुधवार पेठेतील ११ बांगलादेशी तरुणी ताब्यात

बुधवार पेठेतील ११ बांगलादेशी तरुणी ताब्यात

February 18, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta