सहकारनगर पोलिसांत गुन्हा : पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगरमधील घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : जुन्या भांडणाचा राग मनात धरून साथीदाराच्या मदतीने धारदार हत्याराने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. पुणे-सातारा रस्ता, बालाजीनगरमधील पदपथावर सायकल रिपेअरिंग करीत असताना २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता हा प्रकार घडला.
कलावती कांबळे (वय ५०, रा. तळजाई वसाहत, पुणे) यांनी सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, पुणे-सातारा रस्त्यावरील पदपथावर कांबळे सायकल मार्टमध्ये फिर्यादीचा मुलगा आतिश शिवाजी कांबळे (वय २७) सायकल रिपेअरिंग करत होता. त्यावेळी आरोपीने जुन्या भांडणाचा राग मनात धरून साथीदारासह हातामध्ये धारदार हत्यारे हातात घेऊन आले आणि तुला संपवूनच टाकतो, असे म्हणत आतिशला जीवे मारण्याच्या उद्देशाने वार करत गंभीर जखमी केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक उमेश लोंढे करीत आहेत.















