योगेश टिळेकर यांचा पाठपुरावा : कात्रजमधील वाहतूक कोंडी सुटण्यास होईल मदत
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : दक्षिण पुण्याचे प्रवेशद्वार असलेल्या कात्रज चौकातील वाहतूक कोंडी दूर होण्यासाठी वंडर सिटी ते राजस सोसायटी सहापदरी
उड्डाणपुलाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते झाले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार गिरीष बापट, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, भिमराव तापकीर, चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, दिलीप मोहिते, माधुरी मिसाळ, मुक्ता टिळक, अशोक पवार, मा. आमदार योगेश टिळेकर, नगरसेवक प्रकाश कदम, वीरसेन जगताप, युवराज बेलदरे, दत्तात्रय धनकवडे, रंजना टिळेकर, वृषाली कामठे, राणी भोसले, मनीषा कदम, अमृता बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती.
वंडर सिटी ते राजस सोसायटी दरम्यान सहा पदरी उड्डाणपूल होणार असून या पुलाची लांबी 1326 मीटर आहे तर उड्डाण पुलाच्या कामासाठी 169.15 कोटी रुपये खर्च होणार आहेत.
यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की या ठिकाणी अनेक दिवसापासून अपघात होत होते. उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी कमी होणार असून आता वाहतूक सुरळीत होणार आहे. हा उड्डाणपूल डबल डेकर पुल बांधता येण्यासाठी प्रयत्न करणार आहे तसेच पुणे सातारा रोड देखील लवकरच मार्गी लागेल. कोल्हापूरमध्ये पुरामुळे पुला खाली पाणी येते त्यासाठी चर्चा करून मार्ग काढणार आहे. रत्नागिरी-कोल्हापूर मार्ग देखील लवकर पुर्ण होणार आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्राची प्रगती व्हावी तसेच आर्थिक प्रगतीमध्येदेखील महाराष्ट्र पुढे जावा.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, महत्त्वाची कामे नितीन गडकरींमुळे मार्गी लागतात.रस्त्यामध्ये ज्यांची जागा जाते ते नाराज होतात परंतु 5-10% लोकांची नाराजी स्वीकारावी लागते तरच विकास होतो.पुणे शहरामध्ये वाहनांचे प्रमाण वाढत आहे. अनेक खासदार मलाही भेटतात आणि आवर्जून सांगतात, केंद्रामध्ये गेल्यानंतर आपले पणाने कोणाकडे कामानिमित्त जावं तर ते म्हणजे नितीन गडकरी. सर्व पक्षीय खासदार असे सांगतात. मलाही कामे झटपट केलेली आवडतात. लोकांना सुविधा देणं हे लोकप्रतिनिधीचं काम असतं. शहरातील महत्त्वाचे ब्रिजसाठी जमीन ताब्यामध्ये घेण्याकरिता निधी महाराष्ट्र सरकारने दिला तर आणखी जास्तीची कामे करू असे गडकरीनी सुचवले.काही राज्यमार्गांचे राष्ट्रीय मार्गात रूपांतर करता येईल. त्याबाबतही लवकरच बैठक घेण्यात येईल. तसेच राज्याच्या रस्ते विकासाच्यादृष्टीने नियोजन करण्यात येईल. पवार साहेब केंद्रात असताना जशी महाराष्ट्राला मदत होत होती तशीच मदत नितीन गडकरींकडून मिळते. काम कसे लवकर पूर्ण होईल व लोकांना त्रास कसा कमी होईल याचा प्रयत्न करावा असे अजित पवार यांनी बोलताना सांगितले.
मी आमदार असताना नोव्हेंबर 2015 ला रस्त्यावर उतरून आंदोलने केली. या रस्त्यावर 43 निष्पाप लोकांचे बळी गेले त्यातील कात्रज चौकात 12 बळी गेले. कात्रज चौकात 20 वर्ष जागा न दिल्याने वाहतूक कोंडी होत होती. महानगर पालिकेत ठराव दिला तसेच झू ओथॉरिटी दिल्लीकडून एन वो सी मिळवली व प्राणी संग्रहलयातून जागा देऊन उड्डाणपूलाचा मार्ग मोकळा झाला. पुढील एक दीड वर्षात हा उड्डाणपुल पुर्ण होईल त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल. कात्रज-कोंढवा रोडसाठी जागा मालक टि.डी.आर. आणी एफ.एस.आय. च्या माध्यमातून जागा महापालिकेला द्यायला तयार होते परंतु आता जाणीव पूर्वक विकास होऊ नये म्हणून दिशाभूल केली जात आहे. लोक आता रोख स्वरूपाचा मोबदला मागत आहेत. त्यामुळे हा रस्ता रखडला आहे.
- योगेश टिळेकर, मा. आमदार
