गुन्हे शाखा युनिट तीनची कारवाई : सव्वातीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क
पुणे : सराईत दोन शिकलगरी गुन्हेगारांस जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट तीनला यश मिळाले असून, आरोपीकडून एकूण सव्वातीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
उत्तमनगर पोलीस स्टेशनमधील गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गुन्हे शाखा युनिट तीनचे पथक १८ सप्टेंबर रोजी पोलीस अंमलदार दीपक क्षीरसागर यांना मिळालेल्या बातमीवरून सराईत शिकलगरी गुन्हेगार लकीसिंग गब्बरसिंग टाक (रा. इंदिरानगर, यवत ता. दौड, जि.पुणे) आणि हरजितसिंग शिसपालसिंग टाक (रा. उत्तर सोलापूर) यांना शिंदे पूल शिवणे पुणे येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे नमुद गुन्ह्यांची चौकशी करता, त्यांनी नमुद गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याच्या ताब्यातून ३,२९,२६५ रुपयांचा माल, ज्यामध्ये सोन्याचांदीचे दागिने, टि.व्ही., एक घड्याळ, दोन रिमोट, दोन पेन ड्राईव्ह व मारुती कार वेगनार तसेच घरफोडीची हत्यारे कटावणी, कटर, स्कूड्रायव्हर, कात्री, गाडीची बनावट नंबर प्लेट असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून उत्तमनगर, लोणीकाळभोर आणि चिंचवड पोलीस स्टेशन येथील प्रत्येकी एक असे एकूण तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच लोणीकंद पोलीस स्टेशनमधील एका गुन्ह्यात पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरची कामगिरी ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त भाग्यश्री नवटके, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, सहायक पोलीस निरीक्षक चवरे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे व पोलीस अंमलदार महेश निबांळकर, संतोष क्षीरसागर, राजेंद्र मारणे, विल्सन डिसोझा, राकेश टेकवडे, सजिव कळंबे, ज्ञानेश्वर चित्ते, दीपक क्षीरसागर, प्रकाश कट्टे, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांनी केली आहे.
