बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : ससून रुग्णालयासमोरील आंबेडकर पुतळ्याजवळील घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : ससून रुग्णालयासमोरील आंबेडकर पुतळ्याजवळील बसथांब्यावर पीएमपी बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशाच्या खिशातून पाकिट अज्ञात चोरट्याने चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. ७ ऑक्टोबर) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.
सूरज सुळे (वय २८, रा. चव्हाणनगर, पाषण रोड, पुणे) यांनी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी ससून रुग्णालयासमोरील पुणे स्टेशनसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथील बसथांब्यावर बसची वाट पाहात होते. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या खिशातून पाकिट जबरदस्तीने काढून धक्का मारून पळून गेला. पाकिटामध्ये एक हजार १०० रुपये रोख व महत्त्वाची कागदपत्रे होती. बंडगार्डन पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक कोळी पुढील तपास करीत आहेत.
















