पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : अंधाराचा फायदा घेऊन धक्का मारून खाली पाडले
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : हडपसर गाडीतळावर चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत चोरट्याने प्रवाशाला धक्का मारून खाली पाडले. त्यानंतर त्यांच्या खिशातील आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला. ही घटना हडपसर गाडीतळासमोरील दत्त मंदिरजवळील पुलाखाली ५ ऑक्टोबर रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली.
शरद दिवेकर (वय ३३, रा.ता. दौंड, जि. पुणे) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले फिर्यादी हडपसर गाडीतळावरील पुलाखालून पीएमपी डेपोसमोरील बसथांब्याकडे जात होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांना धक्का मारून खाली पाडले आणि खिशातील आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला. हडपसर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड पुढील तपास करीत आहेत.



















