दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : सोमवारी सकाळी धक्कादायक घटना घडली
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : दत्तवाडी परिसरात फिरत्या राणी नावाच्या श्वानाला डोक्यात रॉड घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली. ही घटना दि ०८/११/२०२१ रोजी ११.०० वाजता दत्तवाडी परिसरात घडली.
भारती अशोक सांळुके ( ५२ वर्षे धंदा-व्यवसाय रा. ३०५ दत्तवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमोल खेडकर (रा. दत्तवाडी) याच्यावर दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांची दि. ०८/११/२०२१ रोजी ११.०० वा सुमारास फिर्यादी त्यांचे राहते घराचे बाहेर उभे असताना जयमहाराष्ट्र मित्रमंडळ येथे मागील ९ ते १० वर्षापासून फिर्यादी यांचे घराचे परिसरात राहणारी राणी नावाने ओळखत असणारे श्वान हीस फिर्यादी यांचे गल्लीत राहणारे व त्यांचे तोंडओळखीचे अमोल खेडकर यांनी फिर्यादी यांचे समोर लोखंडी गज राणीच्या डोक्यात मारुन तिला जखमी केले व त्यामुळे राणी या श्वानाचा मृत्यू झाला. यामुळे फिर्यादी यांनी अमोल खेडकर याचेविरुदध कायदेशीर तक्रार दिल्याने गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक आर. जे. कस्पटे तपास करत आहेत.
