महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
बार्शी : काेराेना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता केलेल्या रुग्ण सेवेबद्दल अर्थात काेराेना महामारीच्या युध्दात अग्रभागी राहिल्याने बार्शीच्या जीवनज्याेत या सामाजिक संघटनेचे संस्थापक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अजित कुंकुलाेळ यांचा ठाणे येथे काेव्हीड याेध्दा म्हणुन गाैरव करण्यात आला.
वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष’ आणि खासदार ‘डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन‘ यांच्या सयुंक्त विद्यमाने ४ थ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे एका कार्यक्रमात अजित कुंकुलाेळ यांना ‘कोविड योद्धा सन्मान’पुरस्कार नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी राज्यमंत्री अदिती तटकरे, राज्यमंत्री बच्चू कडू, पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने, महाराष्ट्र डिजीटल मिडिया संपादक, पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने,आमदार निलेश लंके वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री अदिती तटकरे, राज्यमंत्री बच्चू कडू, वरुण सरदेसाई, पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने, पत्रकार राजीव खांडेकर, महाराष्ट्र डिजीटल मिडिया संपादक, पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने,आमदार नितीन बानगुडे-पाटील उपस्थित होते. याप्रसंगी निवडक ५० रुग्णालयांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कुंकुलाेळ यांनी काेराेना महामारीच्या काळात साेलापुर जिल्ह्यातील पहिले कम्युनिटी किचन सुरू करत ते यशस्वीपणे सांभाळत गरजुंना व काेराेना रुग्णांना दाेन वेळचे दर्जेदार जेवन दिले तसेच सँनिटायझर व मास्क चे माेफत वाटप केले. रस्त्यावर उतरुन काेराेना रुग्णांना वैद्यकीय सुविधा मिळवुन देण्याचा प्रयत्न केला. रक्तपेढी आपल्यादारी हा अनाेखा उपक्रम राबवत काेराेना काळातील रक्ताची गरज भागवली. काेराेना रूग्णांसाठी प्लाझ्मा थेरेपीसाठी रक्तपेढीच्या माध्यमातुन प्लाझ्मा माफक दरात उपलब्ध करून दिला. या सर्व सामाजिक कामाची दखल घेत कुंकुलाेळ यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
यावेळी यश कुंकुलोळ, मातृभूमी प्रतिष्ठान चे अध्यक्ष संतोष ठोंबरे, संचालक शहाजी फुरडे-पाटील, डॉ संजय अंधारे, मुंबई मेट्रोचे संतोष कौलवर,नाट्य निर्माते दीपक नलावडे उपस्थित होते.
