• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 4, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

पत्नीच्या डोक्यात मारहाण करून खून करणाऱ्या पतीला अटक

February 4, 2026
0
15 02 25 1
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

पाय घसरून पडल्याचा बनाव : रक्ताचे डाग पुसून पुरावा नष्ट करणारे दोघे नातेवाईकही जेरबंद

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

पुणे : दारूच्या नशेत पतीने पत्नीच्या डोक्यात कठीण वस्तूने मारहाण करून तिला गंभीर जखमी केले. उपचार सुरू असताना पाच दिवसांनी तिचा मृत्यू झाला. ही घटना पाय घसरून पडल्याने घडल्याचा बनाव करण्यात आला होता. मात्र शवविच्छेदन अहवाल आणि स्थानिक महिलांच्या जबाबांवरून खडक पोलिसांनी पतीसह पुरावा नष्ट करणाऱ्या दोन नातेवाईकांना अटक केली आहे.

याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अनिता तोंडे यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती तुषार ऊर्फ गणेश विलास तुपसौंदर्य (वय २८, रा. हरकानगर, भवानी पेठ), त्याचा नातेवाईक मनोज रोहिदास कांबळे (वय ३९, रा. काशीवाडी, भवानी पेठ) आणि त्याची पत्नी वनिता मनोज कांबळे (वय ३२, रा. गंजपेठ) यांना अटक करण्यात आली आहे. मृत महिलेचे नाव वैष्णवी तुषार तुपसौंदर्य (वय २३, रा. गंजपेठ) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ फेब्रुवारी रोजी ससून रुग्णालयातून महिलेच्या मृत्यूची माहिती खडक पोलिसांना देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक अनिता तोंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ससून रुग्णालयात जाऊन पंचनामा केला. त्या वेळी तुषार तुपसौंदर्य याने २८ जानेवारी रोजी वैष्णवी हिचा घरात पाय घसरून पडल्याने डोक्याला मार लागल्याचे सांगितले होते.

मात्र शवविच्छेदन अहवालात डोक्याला झालेल्या मारामुळे मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले. अनिता तोंडे यांनी शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांशी चर्चा केली असता, वैष्णवी हिच्या डोक्याला, कानाजवळ व डोळ्याजवळ गंभीर जखमा आढळून आल्या. या जखमा पाय घसरून पडल्याने होऊ शकत नसून टणक वस्तूने जबर मारहाण केल्यामुळे झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

यानंतर पोलिसांनी तुपसौंदर्य यांच्या घराजवळील नागरिकांकडे चौकशी केली. स्थानिक महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जानेवारी रोजी दुपारी साडे दोनच्या सुमारास तुषार याने दारूच्या नशेत वैष्णवी हिच्यावर मारहाण केली. या मारहाणीत ती रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडली होती. त्या वेळी तुषार बाहेर उभा राहून फोनवर जोरजोरात बोलत आपण तिला मारून टाकल्याचे सांगत होता.

स्थानिक महिलांनी त्याच्या मुलांना बोलावून वैष्णवी हिला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, तुषारचे नातेवाईक मनोज कांबळे आणि त्याची पत्नी वनिता कांबळे यांनी घरातील फरशीवर सांडलेले रक्त पुसून पुरावा नष्ट केला.

डॉक्टरांचा अहवाल आणि स्थानिक महिलांचे जबाब लक्षात घेऊन पोलिसांनी तुषार तुपसौंदर्य याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. तसेच पुरावा नष्ट केल्याप्रकरणी मनोज व वनिता कांबळे यांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार करीत आहेत.

Feb 20264

Latest Articles

शतक महोत्सवी शाळेचे सेवानिवृत्त प्राचार्य स्वामीराव हिरोळीकर यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न

शतक महोत्सवी शाळेचे सेवानिवृत्त प्राचार्य स्वामीराव हिरोळीकर यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न

February 4, 2026
ब्रम्हा कॉर्पचे करण अगरवाल, अजय अगरवाल यांच्यासह ८ जणांविरुद्ध गुन्हा

ब्रम्हा कॉर्पचे करण अगरवाल, अजय अगरवाल यांच्यासह ८ जणांविरुद्ध गुन्हा

February 4, 2026
अंमली पदार्थांची तस्करी करणारे दोन दुकानदार जेरबंद

अंमली पदार्थांची तस्करी करणारे दोन दुकानदार जेरबंद

February 4, 2026

पुण्यात चाललंय काय? तरुणावर जीवघेणा हल्ला, पाठलाग करून केले सपासप वार

February 4, 2026
सूर्यदत्त जीवनगौरव व राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा

सूर्यदत्त जीवनगौरव व राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा

February 4, 2026
Load More
Previous Post

शतक महोत्सवी शाळेचे सेवानिवृत्त प्राचार्य स्वामीराव हिरोळीकर यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

शतक महोत्सवी शाळेचे सेवानिवृत्त प्राचार्य स्वामीराव हिरोळीकर यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न

शतक महोत्सवी शाळेचे सेवानिवृत्त प्राचार्य स्वामीराव हिरोळीकर यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न

February 4, 2026
ब्रम्हा कॉर्पचे करण अगरवाल, अजय अगरवाल यांच्यासह ८ जणांविरुद्ध गुन्हा

ब्रम्हा कॉर्पचे करण अगरवाल, अजय अगरवाल यांच्यासह ८ जणांविरुद्ध गुन्हा

February 4, 2026
अंमली पदार्थांची तस्करी करणारे दोन दुकानदार जेरबंद

अंमली पदार्थांची तस्करी करणारे दोन दुकानदार जेरबंद

February 4, 2026

पुण्यात चाललंय काय? तरुणावर जीवघेणा हल्ला, पाठलाग करून केले सपासप वार

February 4, 2026
सूर्यदत्त जीवनगौरव व राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा

सूर्यदत्त जीवनगौरव व राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा

February 4, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
शतक महोत्सवी शाळेचे सेवानिवृत्त प्राचार्य स्वामीराव हिरोळीकर यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न

शतक महोत्सवी शाळेचे सेवानिवृत्त प्राचार्य स्वामीराव हिरोळीकर यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न

February 4, 2026
ब्रम्हा कॉर्पचे करण अगरवाल, अजय अगरवाल यांच्यासह ८ जणांविरुद्ध गुन्हा

ब्रम्हा कॉर्पचे करण अगरवाल, अजय अगरवाल यांच्यासह ८ जणांविरुद्ध गुन्हा

February 4, 2026
अंमली पदार्थांची तस्करी करणारे दोन दुकानदार जेरबंद

अंमली पदार्थांची तस्करी करणारे दोन दुकानदार जेरबंद

February 4, 2026

पुण्यात चाललंय काय? तरुणावर जीवघेणा हल्ला, पाठलाग करून केले सपासप वार

February 4, 2026
सूर्यदत्त जीवनगौरव व राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा

सूर्यदत्त जीवनगौरव व राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा

February 4, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

शतक महोत्सवी शाळेचे सेवानिवृत्त प्राचार्य स्वामीराव हिरोळीकर यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न

शतक महोत्सवी शाळेचे सेवानिवृत्त प्राचार्य स्वामीराव हिरोळीकर यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न

February 4, 2026
ब्रम्हा कॉर्पचे करण अगरवाल, अजय अगरवाल यांच्यासह ८ जणांविरुद्ध गुन्हा

ब्रम्हा कॉर्पचे करण अगरवाल, अजय अगरवाल यांच्यासह ८ जणांविरुद्ध गुन्हा

February 4, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta