भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या वतीने चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पोलिस वर्धापन दिनानिमित्त भारती विद्यापीठाच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यामंदिर येथे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या वतीने चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
भारती विद्यापीठातील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात आयोजित चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक यश बंडगर, द्वितीय क्रमांक आर्यन मोरे तर आर्यन भोमे याने तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ चित्रांची निवड श्रेयश खाडे, ओम चव्हाण यांची करण्यात आली.
पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता यादव व विद्यालयाचे प्राचार्य रमेश बेल्लम ,सामाजिक समन्वय समिती भारती विद्यापीठ परिसर सदस्य मयूर मसुरकर यांच्या हस्ते विजेत्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
स्वागत व प्रास्ताविक अनिल पाटील यांनी केले. तर स्पर्धेचे परीक्षण विद्यालयातील शिक्षक सुनील भालेराव व अशोक रूपनवर, प्रफुल्ल कुंभार यांनी केले. आभार संजय मंडले यांनी मानले. अप्पा रेणुसे यांच्या सहकार्याने ज्ञानपीठाच्या चिंतामणी विद्यालयात निबंध स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. ‘मी पोलिस झालो तर’, आणि ‘पोलिस नसते तर’ या विषयांवर या स्पर्धा घेण्यात आल्या.
या स्पर्धेत श्रुती शिर्के हिने प्रथम क्रमांक पटकावला तर व्दितीय क्रमांक ज्ञानेश्वरी कुंभार हिने व तृतीय क्रमांक श्रध्दा पवार हिने मिळवला. गार्गी भुवड व साहिल जाधव यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) व मुख्याध्यापिका सायली गोवेकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. शिक्षिका निता लोंढे यांनी सुत्रसंचालन केले.
यावेळी पोलिस हवालदार संतोष भापकर व वामन पडळकर उपस्थित होते.
