नगरसेवक प्रकाश कदम : परिसर १०० टक्के लसीकरणयुक्त करण्याचे उद्देश
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : ‘लसीकरण आपल्या दारी’ या मोहिमेअंतर्गत “प्रगती व्हॅक्सीन एक्सप्रेस” या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली. प्रगती फाऊंडेशन आणि बाळासाहेब देवरस पॉलीक्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने हा लसीकरणाचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात या मोहिमेद्वारे घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात या मोहिमेद्वारे १०२१९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले होते. ही मोहिम १० जानेवारीपासून २४ जानेवारीपर्यंत कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात राबविण्यात येणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रतिक कदम यांनी दिली.
नगरसेवक प्रकाश कदम आणि माजी नगरसेविका भारती कदम यांच्या संकल्पनेतून कोरोनावर मात करण्यासाठी परिसर १०० टक्के लसीकरणयुक्त करण्यात येणार आहे. त्यासाठी परिसरातील प्रत्येक घरी जाऊन लस देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन बुलढाणा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कॉसमॉस बँकेचे चेअरमन मिलिंद काळे, वेलू पूनावाला मेमोरियल हॉस्पिटलचे डॉ. लजपतराय आर्य, संजय कुलकर्णी, संतोष धुमाळ यांच्यासह फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.
