सोलापूर न्यायदंडाधिकाऱ्यांचा आदेश : सहायक पोलीस निरीक्षकाची साक्ष महत्त्वाची ठरली
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
सोलापूर : मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला प्रथम सोलापूरच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी साडेतीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. सहायक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर यांची साक्ष महत्त्वाची ठरली.
भारत दत्तात्रय गायकवाड (रा. वडाळा, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे.
विशाल जगताप (रा. वडाळा, ता.उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) यांनी रेडमी मोबाईल हँडसेट चोरीला गेल्याची पोलिसांत फिर्याद दिली होती. पोलिसांनी आरोपीला पकडून मुख्य न्यायदंडाधिकारी सोलापूर यांच्या न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते. गुन्ह्याची व खटल्याची सुनावणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सोलापूर नं.९ यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून शिक्षा सुनावली.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, परि. सहायक पोलीस अधीक्षक सत्य साई कार्तिक, प्रभारी पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर, सहायक पोलीस फौजदार विवेक सांजेकर, पोलीस नाईक श्रीराम आदलिंग, दीपक पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. सरकारी पोलीस वकील काळे व कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सुरेश राठोड व सुमन वाडे यांनी काम पाहिले.