• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 24, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

५ रुपये रोजावर शेतमजूरी करणारी महिला बनली अब्जाधीश कंपनीची सीईओ

December 18, 2023
0
18 12 23 01
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल

विशाखापट्टणम : १८व्या वर्षी ती दोन मुलींची आई झाली. ५ रुपये रोजावर शेतमजूरीचं काम केलं, नंतर मात्र तिने ‘आकाशात झेप घ्यायची’ ठरवलं.

असं म्हणतात, तुमचं वय आणि परिस्थिती काहीही असू देत, जर तुमच्यात जिद्द असली तर सर्वकाही यशात बदलण्याची क्षमता तुमच्यात असते. जिद्द ही नेहमीच परिस्थितीला झुकण्यास भाग पाडते. स्वप्न उराशी बाळगले की ते पूर्ण करण्यासाठी लागते ती फक्त जिद्द आणि चिकाटी. हे दोन गुणधर्म आपल्याजवळ असले की, आपण कितीही प्रतिकूल परिस्थितीत असलो तरी आपल्याला या परिस्थितीशी सामना करून आपल्या स्वप्नांपर्यंत पोहोचता येते. अशाच एका महिलेनं परिस्थितीवर मात करत आकाशात झेप घ्यायची ठरवलं आणि आता ती अमेरिकेतल्या ‘की सॉफ्टवेअर सोल्युशन्स’ची सीईओ आहे.
प्रचंड इच्छाशक्ती, असामान्य आत्मविश्वास आणि जबरदस्त कार्यशक्ती असलेल्या माणसाने ठरवले तर काहीही अशक्य नसते, हे ज्योथी रेड्डीने तिच्या चिकाटी, कठोर परिश्रम आणि असामान्य कर्तृत्वाने साऱ्या जगाला दाखवून दिले. ज्योथी रेड्डी यांच्याबद्दल जाणून घेऊ…
पाच रुपये रोजावर शेतमजुरीचं काम
ज्योथीचा जन्म विशाखापट्टणम येथील वारंगम गावात १९७० साली झाला. पाच बहिणींमध्ये ज्योथी सगळ्यात लहान. घराची परिस्थिती अतिशय गरीब आणि हलाखीची आणि म्हणूनच ज्योथीची रवानगी अनाथ आश्रमात झाली. आर्थिक अडचणींमुळे तिला लग्न करावं लागलं. १८व्या वर्षी ती दोन मुलींची आई झाली. ५ रुपये रोजावर शेतमजूरीचं काम केलं, नंतर मात्र तिने ‘आकाशात झेप घ्यायची’ ठरवलं.
‘नेहरू युवा केंद्रा’कडून एक संधी चालून आली
केंद्र सरकारच्या योजनेमुळे तिच्या आयुष्यात पहिला टर्निंग पॉइंट आला. ‘नेहरू युवा केंद्रा’कडून एक संधी चालून आली, ज्यामुळे तिला पुढील शिक्षणाची संधी मिळाली. पण, पुरेसे पैसे नसल्यानं तिने रात्री टेलरिंगचे काम करून स्वत:चा आणि मुलींचा उदरनिर्वाह केला. हे करत असतानाच ज्योथीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटीतून कला शाखेतलं शिक्षण पूर्ण केलं. यासोबतच ती टायपिंगसुद्धा शिकली. खरंतर हे अजिबातच सोपं नव्हतं, कारण पैश्यांची चणचण तर होतीच, पण घरी लक्ष देताना ओढाताण होत असल्याने जवळच्या नातेवाईकांचा भयंकर त्राससुद्धा तिला सहन करावा लागत होता.
ज्योतीने १९९४ मध्ये डॉ. बीआर आंबेडकर मुक्त विद्यापीठातून बीए आणि १९९७ मध्ये काकतिया विद्यापीठातून पीजी पदवी मिळवली. या पदवींमुळे तिला अधिक कमाई करण्यात मदत झाली. ज्योथीला एका शाळेत ३९८ रुपयांच्या पगाराची विशेष शिक्षकाची नोकरी मिळाली, परंतु ते पुरेसे नव्हते. या नोकरीसाठी रोज ज्योथीला दोन तासांचा प्रवास करावा लागत असे आणि येण्याजाण्यात तिचा बराचसा पगारसुद्धा खर्च व्हायचा. म्हणून आता यावर तोडगा म्हणून कल्पक आणि कष्टाळू ज्योथीने प्रवासात साड्या विकायला सुरुवात केली.
आयुष्याचा टर्निंग पॉइंट
याचदरम्यान पुढचा टर्निंग पॉइंट आला, जेव्हा एक नातेवाईक अमेरिकेहून भेटीला आले. यामुळे तिला परदेशातील संधींची जाणीव झाली. ज्योतीने कॉम्पुटर कोर्स केला. समाजाच्या आणि तिच्या कुटुंबाच्या दबावाला न जुमानता, आपल्या दोन्ही मुली मिशनरी -हॉस्टेलमध्ये ठेवून त्यांची नीट व्यवस्था लावून ज्योथी अमेरिकेला रवाना झाली.
अमेरिकेमध्ये आणखी मोठा संघर्ष तिची वाट बघत होता. स्वतःचा खर्च भागवण्यासाठी तिने पेट्रोल पंपावर काम करायला सुरुवात केली. तसेच बेबी सिटींग, हमाली अशी कामंसुद्धा ज्योथीने तिथे कुठलीही तमा न बाळगता केली. व्हिडीओ-पार्लरमध्ये काम केलं. एका गुजराथी परिवाराकडे पेइंग गेस्ट म्हणून राहत असताना नातेवाईकांच्या मदतीने तिला एका कंपनीत काम मिळालं आणि नंतर अश्याच दुसऱ्या एका कंपनीत तिला सॉफ्टवेअर रिक्रुटरचा जॉब मिळाला.
अमेरिकेतील कंपनीच्या सीईओ
मेक्सिकोला स्टॅम्पिंगसाठी गेली असता तिच्या मनात एक कल्पना आली, ”आपणसुद्धा सहजच असाच एक उद्योग सुरू करू शकतो.” कारण ज्योथीला या संदर्भातल्या सगळ्या पेपरवर्कची व्यवस्थित माहिती होती. स्वतःजवळ असलेली सर्व बचत पणाला लावून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. यामध्ये कंपीनीची उलाढाल वाढू लागली आणि अखेरीस २०१७ मध्ये कंपनीची उलाढाल एक अब्ज डॉलरपर्यंत पोहचली. आजही ज्योथी ‘की सॉफ्टवेअर सोल्युशन्स’ यशस्वीपणे चालवते आहे.


18 12 23 01
Download

Latest Articles

बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोला पडला खड्डा

बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोला पडला खड्डा

March 24, 2026
‘पीटीपी’ अ‍ॅपवर तक्रार करा, बेकायदा होर्डिंग्सवर गुन्हे

‘पीटीपी’ अ‍ॅपवर तक्रार करा, बेकायदा होर्डिंग्सवर गुन्हे

March 24, 2026
मानलेल्या बहिणीची छेड काढल्यावरून तरुणाला मारहाण करून केले जखमी

मानलेल्या बहिणीची छेड काढल्यावरून तरुणाला मारहाण करून केले जखमी

March 24, 2026
विजेच्या धक्क्याने कारागीराचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने कारागीराचा मृत्यू

March 24, 2026
पूर्ववैमनस्यातून तरुणावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

पूर्ववैमनस्यातून तरुणावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

March 24, 2026
Load More
Previous Post

December 2017

Next Post

उच्चशिक्षित युवकांच्या सहभागाने रंगले परिचय संमेलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

March 19, 2026
हळदीच्या पाकिटात लपवून करत होते गांजा विक्री

हळदीच्या पाकिटात लपवून करत होते गांजा विक्री

March 19, 2026
जखमेवर मलमपट्टी करणाऱ्या डॉक्टराला मद्यपीने केली मारहाण

जखमेवर मलमपट्टी करणाऱ्या डॉक्टराला मद्यपीने केली मारहाण

March 19, 2026
एचआर मॅनेजरकडून कंपनीला १ कोटींचा गंडा

‘इन्फोसिस’च्या नावावर बनावट बिले करुन घातला ४२ लाखांचा गंडा

March 19, 2026
एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांनी घातला १० लाखांचा गंडा

एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांनी घातला १० लाखांचा गंडा

March 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

March 19, 2026
लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

March 19, 2026
हळदीच्या पाकिटात लपवून करत होते गांजा विक्री

हळदीच्या पाकिटात लपवून करत होते गांजा विक्री

March 19, 2026
जखमेवर मलमपट्टी करणाऱ्या डॉक्टराला मद्यपीने केली मारहाण

जखमेवर मलमपट्टी करणाऱ्या डॉक्टराला मद्यपीने केली मारहाण

March 19, 2026
एचआर मॅनेजरकडून कंपनीला १ कोटींचा गंडा

‘इन्फोसिस’च्या नावावर बनावट बिले करुन घातला ४२ लाखांचा गंडा

March 19, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

March 19, 2026
लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

लक्ष्मीनगर पोलिसांनी तरुणाकडून देशी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

March 19, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta