जैन सोशल ग्रुप पिंपरी चिंचवडचा ‘जलसेवा’ उपक्रम
महाराष्ट्र जैन वार्ता
पिंपरी चिंचवड : जैन सोशल ग्रुप (JSG) पिंपरी चिंचवडतर्फे “जलसेवा” हा समाजोपयोगी व प्रेरणादायी उपक्रम सुरू करण्यात आला असून, या उपक्रमाला ग्रुपमधील सदस्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांना स्वच्छ, थंड व ताजे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेला हा उपक्रम सध्या पिंपरी चिंचवड शहरातील सुमारे १५ ठिकाणी यशस्वीपणे राबविला जात आहे.
या अंतर्गत दररोज पाण्याचे कॅन नियमितपणे बदलले जात असून, त्यामुळे नागरिकांना सातत्याने शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होत आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे.
या उपक्रमाची दखल JSG इंटरनॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष बिरेनभाई शहा, महाराष्ट्र रिजनचे अध्यक्ष दिलीपभाई मेहता तसेच पुणे झोनचे अध्यक्ष सुजय शहा यांनी घेतली असून, त्यांचे मार्गदर्शनही लाभले आहे.
तसेच राजेंद्र धोका, सतीश खाबिया आणि डॉ. लुंकड यांचेही मोलाचे मार्गदर्शन या उपक्रमासाठी लाभले आहे.
कमिटी सदस्य निलेश लुंकड, श्रेणिक मंडलेचा, संजय जैन, प्रणव खाबिया सक्रिय सहभाग नोंदवत हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष योगदान दिले आहे.
प्रेसिडेंट मयूर पगारिया यांच्या कार्यकाळात “जलसेवा” सारखा उपक्रम राबविण्यात आल्याचा विशेष आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
या उपक्रमासाठी JSG पिंपरी चिंचवड ग्रुपमधील सदस्यांनी सदस्यांनी उदारपणे दान दिले असून, त्या निधीतूनच ही सेवा अखंडपणे सुरू आहे.
सध्या निगडी, भोसरी, चिंचवडगाव, चिंचवड स्टेशन, सांगवी आणि चाकण या भागांमध्येही हा उपक्रम प्रभावीपणे चालू आहे. तसेच संदीप चुतर, निलेश लुंकड, अतुल कांकरिया, प्रवीण लुनावत, राजमल मुनोत, राजन पोरवाल, विनायक बाफना, सचिन मुथा तसेच मंगल मार्बल यांनी आपल्या व्यावसायिक ठिकाणी जलसेवा सुरू करून समाजासाठी आदर्श निर्माण केला आहे.
त्यांच्या या योगदानाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
