वारजे माळवाडी पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : सराईत सोनसाखळी चोर सचिन पोळ याला जेरबंद करण्यात वारजे माळवाडी पोलिसांना यश आले आहे.
सचिन पोळ, (वय ४० वर्षे, रा. फ्लॅट नंबर १०, आदेश अपार्टमेंट, भुसारी कॉलनी, कोथरुड) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्या ताब्यातुन ३०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
वाराणसी सोसायटी, ऋतुविहार बिल्डींगच्या गेटसमोर, वारजे येथे ही घटना घडली. काळ्या रंगाची दुचाकी अॅक्टीव्हा मोपेड गाडीवर एक अज्ञात व्यक्ती त्याची पुर्णपणे ओळख लपवुन जेष्ठ नागरीक महिला ह्या शतपावली करीत असताना त्यांच्या गळ्यातील ८ ग्रॅम वजनाची सोन्याची अर्धवट चैन पत्ता विचारण्याच्या बहाण्याने जबरदस्तीने हिसका मारुन चोरून घेऊन गेला. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठांनी योग्य त्या सुचना देऊन आरोपीचा शोध घेण्यास आदेश दिले.
त्याअनुषांगाने अनोळखी व्यक्तीचा तपास, तपास पथकातील अधिकारी आर.एन. पार्वे, व स्टाफ सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे घेत होते. हा आरोपी वाराणसी सोसायटी परिसरात एका ठिकाणी खाजगी कॅमेरामध्ये कैद झाला. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीवर श्री स्वामी समर्थांचे स्टिकर असल्याची फक्त ओळख त्याची होती. या आरोपीचा शोध घेत असताना आरोपी हा उत्तमनगर भागातील एका खाजगी कॅमेरामध्ये विना मास्कचा कैद झाल्याचे दिसले. त्यामुळे या आरोपीचा फोटो घेऊन तपास पथकातील अंमलदार प्रदिप शेलार व श्रीकांत भांगरे यांना माहिती मिळाली की ” सीसीटीव्ही फुटेजमधील आरोपी हा शिंदे पुल येथे त्याच्याकडे असलेल्या दुचाकी अॅक्टीव्हा मोपेड वर येऊन संशयीतरित्या थांबला आहे. त्याच्या गाडीवर श्री स्वामी समर्थींचे स्टिकर आहे” अशी माहिती मिळाल्याने सापळा लावून स्टाफने फुटेज मधील व्यक्तीला शिताफीने पकडले. त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने दाखल गुन्हा केल्याची कबुली दिली. या आरोपीवर कोथरुड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये यापुर्वी सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील,पोलीस उपआयुक्त परिमंडळ ०३ सुहेल शर्मा, सहाय्यक पोलीस आयुक्त कोथरुड विभाग भिमराव टेळे वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जैतापुरकर व पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे, हनुमंत मासाळ, संतोष नांगरे, विजय भुरुक, बंटी मोरे, अजय कामठे, अमोल सुतकर, ज्ञानेश्वर गुजर यांनी केली आहे.