पीसीबी गुन्हे शाखेची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : हडपसर पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या, अजय मौजण या अट्टल गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. पीसीबी गुन्हे शाखेने ही कारवाई केली. अजय मौजण, (वय-१९ वर्षे, रा. पाचुंदकर वस्ती, देवाची वाडी, रांजणगाव गणपती, रांजणगाव, ता. शिरूर जि. पुणे) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे १ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश देण्यात आले आहेत.
पुणे पोलीस आयुक्तालयातील हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हे करणारा गुन्हेगार हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह रांजणगाव एमआयडीसी व हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चाकु, लोखंडी कोयता यासारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह दुखापतीसह जबरी चोरी, चोरी, घराविषयी आगळीक, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ५ वर्षामध्ये त्याच्याविरूध्द ४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.
ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन रविंद्र शेळके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखेचे चंद्रकांत बेदरे, पोलीस आधिकारी व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली. स्थानबध्दतेच्या आजपर्यंत ७७ कारवाया केल्या आहेत. या अजय मौजण गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई.
