• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

हॉटेल कॉनरॉडच्या फायनान्स संचालकाला २० लाखांचा गंडा

February 2, 2026
0
01 02 25 5
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

सायबर चोरट्यांनी हॉटेल मालकाच्या नावाने व्हॉटसअॅप मेसेज करून केली फसवणूक

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

पुणे : बंडगार्डन परिसरातील मंगलदास रोडवरील हॉटेल कॉनरॉडचे मालक संदीप रहेजा यांच्या नावाने व्हॉटसअॅप मेसेज करून सायबर चोरट्यांनी हॉटेलच्या फायनान्स संचालकाला २० लाख ९० हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे.

याबाबत हॉटेल कॉनरॉडचे फायनान्स संचालक बीपलब चक्रबोरती (वय ५४, रा. प्रभात रोड) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही फसवणुकीची घटना ८ जानेवारी २०२६ रोजी घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीपलब चक्रबोरती हे हॉटेल कॉनरॉड येथे डायरेक्टर ऑफ फायनान्स म्हणून काम करतात. ८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता ते मंगलदास रोडवरील हॉटेल कॉनरॉडमध्ये काम करत असताना त्यांच्या व्हॉटसअॅपवर एका क्रमांकावरून मेसेज आला.

तो मेसेज हॉटेल कॉनरॉड व पाम ग्रुप बीच हॉटेल्स या कंपनीचे मालक संदीप रहेजा यांचा असल्याचे दिसून आले.या मेसेजमध्ये म्हटले होते की, “बीपलब, मी संदीप रहेजा. हा माझा पर्सनल नंबर आहे. कोणाला शेअर करू नका, सेव्ह करा.” त्यानुसार त्यांनी हॉटेल मालक संदीप रहेजा यांच्या नावाने तो नंबर सेव्ह केला.

त्यानंतर लगेच दुसरा मेसेज आला. त्यात आयटीसीकडून काही रक्कम आज आली आहे का, असे विचारण्यात आले. त्यांनी चेक करतो, असे सांगितले. त्यांनी ३५ लाख ६१ हजार रुपये येणार असल्याचे सांगितले. त्यांनी चेक केले, मात्र अशी कोणतीही रक्कम आलेली नव्हती.

“एक तासाने चेक करा,” असा त्या क्रमांकावरून मेसेज आला. त्यानंतर थोड्या वेळाने संदीप रहेजा यांच्या व्हॉटसअॅप नंबरवरून बँक डिटेल्स पाठविण्यात आल्या. अमर सिंग यांच्या खात्यात २० लाख ९० हजार ६०१ रुपये पाठविण्यास सांगण्यात आले.

तसेच पेमेंट पीजीबीएचपीएल खात्यातून करण्यास सांगण्यात आले. आपल्याशी कंपनीचे मालक संदीप रहेजा हेच बोलत असल्याचा त्यांना विश्वास बसला. त्यांनी कॉल केला, परंतु ते मिटिंगमध्ये असल्याचे सांगून कॉल करू नको, असा मेसेज आला.

कंपनीच्या व्यवहारांमध्ये नेहमीच ग्राहकांकडून पैसे येण्याबाबत चर्चा होत असल्याने बीपलब चक्रबोरती यांचा विश्वास बसला. त्यांनी दिलेल्या बँक डिटेल्सनुसार २० लाख ९० हजार ६०१ रुपये पाठविले. रक्कम पाठवल्यानंतर त्यांनी त्या व्हॉटसअॅप नंबरवर कॉल केला, मात्र कॉल उचलला गेला नाही.

त्यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी कंपनीचे मालक संदीप रहेजा यांच्या मुंबई येथील कार्यालयात कॉल केला. त्यावेळी त्यांना समजले की, संदीप रहेजा यांनी कोणतेही पैसे पाठविण्यास सांगितले नव्हते. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्यानंतर त्यांनी १९३० वर तात्काळ ऑनलाईन तक्रार दाखल केली. कंपनीचे मालक असल्याचे भासवून फसवणूक केल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके तपास करीत आहेत.

Feb 2026

Latest Articles

जेबीएन क्रिकेट लीग सीजन 5 का सफल आयोजन

जेबीएन क्रिकेट लीग सीजन 5 का सफल आयोजन

February 2, 2026
दत्तनगरमधील वेद फुड चितळे बंधु दुकान फोडणारा गुन्हेगार जेरबंद

दत्तनगरमधील वेद फुड चितळे बंधु दुकान फोडणारा गुन्हेगार जेरबंद

February 2, 2026

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

February 2, 2026
स्वामिनी संस्थेच्यावतीने ‘आदर्श मुख्याध्यापिका’ म्हणून सन्मान

स्वामिनी संस्थेच्यावतीने ‘आदर्श मुख्याध्यापिका’ म्हणून सन्मान

February 2, 2026
लिफ्टच्या बहाण्याने तरुणाला मारहाण करून लुबाडले

लिफ्टच्या बहाण्याने तरुणाला मारहाण करून लुबाडले

February 2, 2026
Load More
Previous Post

स्वामिनी संस्थेच्यावतीने ‘आदर्श मुख्याध्यापिका’ म्हणून सन्मान

Next Post

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

दत्तनगरमधील वेद फुड चितळे बंधु दुकान फोडणारा गुन्हेगार जेरबंद

दत्तनगरमधील वेद फुड चितळे बंधु दुकान फोडणारा गुन्हेगार जेरबंद

February 2, 2026
हॉटेल कॉनरॉडच्या फायनान्स संचालकाला २० लाखांचा गंडा

हॉटेल कॉनरॉडच्या फायनान्स संचालकाला २० लाखांचा गंडा

February 2, 2026
स्वामिनी संस्थेच्यावतीने ‘आदर्श मुख्याध्यापिका’ म्हणून सन्मान

स्वामिनी संस्थेच्यावतीने ‘आदर्श मुख्याध्यापिका’ म्हणून सन्मान

February 2, 2026
लिफ्टच्या बहाण्याने तरुणाला मारहाण करून लुबाडले

लिफ्टच्या बहाण्याने तरुणाला मारहाण करून लुबाडले

February 2, 2026
गंगाधाम चौक ते आईमाता मंदिर रस्त्यावरील तीव्र उतार कमी होणार

गंगाधाम चौक ते आईमाता मंदिर रस्त्यावरील तीव्र उतार कमी होणार

January 31, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
ठेकेदाराने पोलिसांना फाशी घेण्याची दिली धमकी

कोंढव्यात तरुणीवर डिलिव्हरी बॉयचा बलात्कार

July 3, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
जेबीएन क्रिकेट लीग सीजन 5 का सफल आयोजन

जेबीएन क्रिकेट लीग सीजन 5 का सफल आयोजन

February 2, 2026
दत्तनगरमधील वेद फुड चितळे बंधु दुकान फोडणारा गुन्हेगार जेरबंद

दत्तनगरमधील वेद फुड चितळे बंधु दुकान फोडणारा गुन्हेगार जेरबंद

February 2, 2026

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

February 2, 2026
हॉटेल कॉनरॉडच्या फायनान्स संचालकाला २० लाखांचा गंडा

हॉटेल कॉनरॉडच्या फायनान्स संचालकाला २० लाखांचा गंडा

February 2, 2026
स्वामिनी संस्थेच्यावतीने ‘आदर्श मुख्याध्यापिका’ म्हणून सन्मान

स्वामिनी संस्थेच्यावतीने ‘आदर्श मुख्याध्यापिका’ म्हणून सन्मान

February 2, 2026

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

जेबीएन क्रिकेट लीग सीजन 5 का सफल आयोजन

जेबीएन क्रिकेट लीग सीजन 5 का सफल आयोजन

February 2, 2026
दत्तनगरमधील वेद फुड चितळे बंधु दुकान फोडणारा गुन्हेगार जेरबंद

दत्तनगरमधील वेद फुड चितळे बंधु दुकान फोडणारा गुन्हेगार जेरबंद

February 2, 2026

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta