महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : शहराच्या प्रथम नागरिक तथा विद्यमान नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांच्या हस्ते समर्थ नगर येथील संस्कार बालक मंदिर शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि सरस्वती देवी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी संस्कार बालक मंदिर शाळेच्या वतीने नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास विर्धे मॅडम, नगरसेवक अभिजीत शेटे, नगरसेविका रीमा शिंदे, सुमित्रा माळी, डॉ. शेंडगे, पत्रकार नंदकुमार देशमुख यांच्यासह विद्यार्थी, पालक व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्याक्रमचे सूत्रसंचालन अलीम शेख सर यांनी केले.
















