रंगणार भूमिपूजन सोहळा व भव्य कुस्त्यांचा फड
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भुम : डॉ. तानाजीराव सावंत यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
याचं दिवशी भूम शहर व तालुक्यातील विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा तसेच कुस्त्यांचा फडही रंगणार आहे. हे कार्यक्रम रविवार २१ जानेवारी रोजी दु. १ ते ४ या दरम्यान होणार आहेत. तर नागरी सत्कार हा नगर परिषद समोर, भूम ता. भूम जि. धाराशिव येथे दुपारी २:१५ वाजता होणार आहे. यावेळी येथे होणार भूमिपूजन सोहळा भूम-वारेवडगांव-कासारी-भोगलगांव-साकत हा १४ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या रस्त्यांचे भूमिपूजन दु. १ वाजता छत्रपती चौक, जिजाऊ नगर, भूम येथे होणार आहे. गोलाई चौक ते एम.आय.डी.सी. सिमेंट काँक्रीट व डांबरीकरण हा १३.८० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या रस्त्याचे भूमिपूजन दु. १:३० वाजता गोलाई चौक, भूम येथे होणार आहे. भूम ते इंदिरानगर पूल काँक्रीट हा ५ कोटी खर्चून बांधलेला रस्ता, इंदिरा नगर पूल हा ३.८० कोटी रुपये खर्चून बांधलेला रस्ता याचे, इंदिरा नगर पूल ते एम.आय.डी.सी. काँक्रीट डांबरी रस्ता हा ५ कोटी खर्चून बांधलेला रस्ता असे भूम शहरातील ११४.६५ कोटी रुपयांच्या सिमेंट रस्त्यांचे भूमिपूजन दुपारी २ वाजता ओंकार चौक, भूम येथे होणार आहे. तसेच संजय (नाना) गाढवे यांच्या वाढदिवसानिमित्तच्या २१ लाख रुपये बक्षिसांच्या भव्य कुस्त्यांचे उद्घाटन दुपारी ४ वाजता कै. वस्ताद सोमा आण्णा पवार कुस्ती संकुल, अलमप्रभू पायथा, भूम येथे होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष संजयनाना गाढवे असणार आहे. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय (दादा) सावंत, शिवसेना नेते प्रशांत (बाबा) चेडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर, माजी कृषी सभापती जिल्हा परिषदेचे आण्णासाहेब देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी (आण्णा) भोईटे, माजी नगराध्यक्षा नगर परिषद संयोगिताताई गाढवे, माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सिद्दीवाल, माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर, माजी नगराध्यक्ष नितीन चेडे माजी नगराध्यक्ष वाशीनागनाथ नाईकवाडी, माजी नगराध्यक्ष, शाकीर शेख, माजी नगराध्यक्ष संजय शिंदे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती विशाल ढगे, विशाल अंधारे, समाधान सातव, प्रविण देशमुख,दत्तात्रय गायकवाड, आप्पासाहेब हाके, अजित पवार, बापू भालेराव, वसंत कांबळे, दिगांबर सुपनर, नगरसेवक मालन अनभुले, सुमित तेलंग , सुमन मांजरे सारिका थोरात, सागर टकले, करुणा शिंदे, सादिक मोमीन, शिवशाला शेंडगे, भागूबाई माळी, आश्रुबा नाईकवाडी, तोफिक कुरेशी, अनिता वारे, मेहेराज बेगम सय्यद, संदिप मोटे, संजय देवडीकर ,धनंजय मस्कर, किरण जाधव असणार आहेत. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख, दत्ता (आण्णा) साळुंके, शिवसेना जिल्हा उपप्रमुख दत्ता (बापू) मोहिते, जिल्हाप्रमुख महिला आघाडी शिवसेना, अर्चनाताई दराडे, माजी जिल्हाप्रमुख शिवसेना गौतम लटके जिल्हाप्रमुख युवासेना बाळासाहेब मांगले, शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी गुंजाळ, शहरप्रमुख शिवसेना व नगरसेवक संजय (काका) पवार तालुकाप्रमुख शिवसेना, आण्णासाहेब जाधव, शहरप्रमुख शिवसेना बाळासाहेब गायकवाड, तालुकाप्रमुख शिवसेना अॅड. सत्यवान गपाट, शहरप्रमुख शिवसेना, सतिश शेरकर, सभापती कृषी उत्पन्न बाजर समितीचे निलेश शेळवणे, उपसभापती कृषी उत्पन्न बाजर समिती जयसिंग गोफणे, उपसभापती रामकिसन गव्हाणे,माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता गायकवाड, युवासेना उपजिल्हाप्रमुख युवराज हुंबे, तालुकाप्रमुख युवासेना राहुल डोके, तालुकाप्रमुख, युवासेना निलेश चव्हाण, युवासेना शहरप्रमुख, प्रभाकर शेंडगे, तालुका प्रमुख युवासेना प्रविण गायकवाड, समाधान भोरे, बाबा पटेल, संजय बोराडे,बापू खामकर, सागर भोसले, अतुल शेळके, वैजिनाथ म्हमाणे, खंडेराव गोयकर, ईश्वर जगदाळे, वैजिनाथ गपाट, भागवत शिंदे, अमोल शिंदे, लालू पवार, मधुकर अर्जुन, काका तांबे,आण्णा साठे, दत्ता नलावडे, सागर खराडे उपस्थित राहणार आहेत. तरी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
