महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : विद्यार्थ्यांच्या अंगी अनेक सुप्त गुण असतात शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळाल्यास त्यांच्या हातून विविध कलात्मक रचना घडू शकते असे “कागदापासून पिशव्यांची निर्मिती कार्यशाळेबाबत त्यांनी आपले मत व्यक्त केले .
आर एम डी फॉउंडेशनद्वारा रसिकलाल माणिकचंद धारीवाल इंग्रजी शाळेत विद्यार्थ्यांसाठी संबंधीत कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत इंग्रजी माध्यमाच्या एकूण २५० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. विविध रंगाच्या कागदी बॅगचे प्रात्यक्षिकं यावेळी सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांसोबत वर्ग शिक्षकही कागदी बॅग बनविण्याचा आनंद घेत होते . विद्यार्थ्यांनी कागदी बॅग बनविल्यानंतर यापुढे घरगुती भाजीपाला किंवा दूध आणण्यासाठी घरीच बॅग बनवू , प्लास्टिक बॅग वापरणार नाही असे सांगितले. यापुढेही अनेक शाळांमध्ये कार्यशाळा मोफत राबविण्यात येईल अशी माहिती फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन यांनी दिली. दिनांक १ मार्च २०२४ रोजी रसिकलाल माणिकचंद धारीवाल यांच्या जन्मदिनानिमित्त सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत रक्तदान शिबीर, आर एम डी बंगला न. ६४, लेन न .३, कोरेगांव पार्क, पुणे येथे आयोजीत केले आहे. सर्व रक्तदात्यांना आमंत्रीत करण्यात येत आहे.