प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजन
महाराष्ट्र न्युज नेटवर्क ; पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : प्रजासत्ताक दिनानिमित्त बळेवाडी स्वामी समर्थ मंदिर येथे वारकरी सांप्रदाय मुलांना पोलीस जाणीव सेवा संघातर्फे खाऊ वाटप करण्यात आले.
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस जाणीव सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष रवी फडणीस यांच्या आदेशानुसार, तसेच बार्शी तालुका अध्यक्ष सम्मेद तरटे यांच्या सूचनेनुसार, आज बार्शी तालुका बळेवाडी श्री संत माणकोजी महाराज विज्ञान गुरुकुल स्वामी समर्थ मंदिर या ठिकाणी पोलीस जाणीव सेवा संघ बार्शीच्या वतीने वारकरी संप्रदायिक मुलांच्या शाळेला भेट देण्यात आली. तसेच त्या ठिकाणी विविध कार्यक्रम घेण्यात आले आणि तेथील मुलांना संघाच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले. तेथील ह. भ. प. दत्तात्रय महाराज शिरसाठ व मच्छिंद्र महाराज देशमुख यांनी पोलीस जाणीव सेवा संघाचे कौतुक करून आभार मानले. यावेळी सत्कार सोहळा देखील संपन्न झाला. यावेळी दत्तात्रय महाराज शिरसाट म्हणाले की, पोलीस जाणीव सेवा संघाचे कार्य अतिशय उत्तम आहे आणि हा कार्यक्रम सर्वांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी पोलीस जाणीव सेवा संघाचे बार्शी शहर अध्यक्ष कौशल्याताई राऊत, उपाध्यक्ष भाग्यश्रीताई बोंडवे, पूजा पुरी, कासारवाडी शाखेचे सहाकार्याध्यक्ष चंद्रकांत कदम, सचिव गणेश शिंदे, रविराज तुंगतकर,अविनाश पाचंगे, तुषार भिसे, विशाल भिसे, अक्षय गायकवाड, विश्वनाथ पोकळे आदी उपस्थित होते.