मोफत डायबेटिक सल्ला व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजीत डुंगरवाल
पुणे : पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तर्फे शुक्रवार, दि. २ फेब्रुवारी रोजी, मधुमेही रुग्णांसाठी मोफत डायबेटिक रेटिनोपॅथी, नेत्र विकार तपासणी, सल्ला व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला व विकारांसंबंधीच्या चाचण्या सवलतीच्या दरात करण्यात येतील. तसेच ज्या रुग्णांना अधिक उपचार किंवा शस्त्रक्रियेची गरज असल्यास सवलतीच्या दरात करण्यात येईल. या शिबिराचा फायदा डोळ्यांचा त्रास असणाऱ्या मधुमेही रुग्णांनी अवश्य घ्यावा. शिबिराची वेळ दुपारी १.०० ते ४.०० वाजेपर्यंत अशी आहे. नाव-नोंदणी करणे अनिवार्य आहे. नाव-नोंदणी व अधिक माहितीसाठी कृपया दूरध्वनी क्रमांक: ०२०-६६०९६०००, विस्तारित क्रमांक : ३२५८ किंवा १२१२ या क्रमांकावर संपर्क साधावा.
