मराठा आरक्षणाचा आनंद साजरा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : मराठा आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर बार्शीतील कसबा पेठेतील तानाजी चौकात शिंदे परिवाराच्या पुढाकारने मंडप घालून लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे, जेष्ठ पत्रकार नाना गव्हाणे, माजी नगरसेवक अंबादास शिंदे, पत्रकार संजय बारबोले, पत्रकार चंद्रकांत करडे, पत्रकार विजय शिंगाडे, पंकज शिंदे, कालभैरव पतसंस्थेचे संचालक मंगेश बारंगुळे, अमोल शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी उमेश काळे म्हणाले की, आज मराठा नेते जरांगे पाटील यांच्या प्रयत्नाने २३ मार्च १९९४ रोजी मराठा आरक्षणाच्या बाबतीत मारलेली खुंटी उपसून खऱ्या अर्थाने शास्वत आरक्षण मिळाले आहे. मराठा महासंघाचे संस्थापक स्व आण्णासाहेब पाटील यांच्या आत्म्यास आज खऱ्या अर्थाने श्रद्धांजली मिळाली आहे. असे सांगत बार्शीतील जुन्या घटनांना उजाळा दिला.
सूत्रसंचालन अनिकेत शिंदे यांनी केले तर आभार अमोल शिंदे यांनी मानले.
