२१,००० रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
सोलापूर : त्याच्या कडून पाच जिवंत काडतुसे प्राप्त झाली आहेत. एकूण २१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
सपोनि नागनाथ खुणे व त्यांचे पथक अवैध अग्निशस्त्राबाबत कारवाई करणेकामी जिल्हयातील गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशिर माहिती मिळाली की, मौजे कुंभारी ता. दक्षिण सोलापूर येथील हॉटेल संगमच्या समोर रेकॉर्डवरील एक इसम अवैध अग्निशस्त्र व जिवंत काडतूस बाळगून थांबला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी तात्काळ कारवाई करणेबाबत आदेशित केले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता एक देशी बनावटीचा गावठी कट्टा व पॅन्टीच्या खिशामध्ये ०५ जिवंत काडतूसे सापडली. त्यास ताब्यात घेवून त्याचे विरूध्द वळसंग पोलीस ठाणे येथे गुरनं २८/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम १९५९ चे कलम ३,२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, राजेश गायकवाड, शिवाजी घोळवे, ख्वाजा मुजावर, प्रकाश कारटकर, विजयकुमार भरले, रवि माने, प्रमोद माने यांनी बजावली आहे.
