वात्सल्यरत्नाश्रीजी यांचे मार्गदर्शन
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : शिवाजी महाविद्यालय मामासाहेब ग्रंथालयातील सभागृहात लक्ष्मण रेषा या विषयावर गुरुवर्य वासल्य रत्नाजींनी सातशे विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांची वर्तमान व पुढील आयुष्याची वाटचाल कशी असावी काय ध्येय असावे वेळेचा सतउपयोग कसा करावा तसेच मोबाईल मुळे होणारे धोके, प्रेम प्रसंगातून जीवन कसे उध्वस्त होते चुकीच्या पावलामुळे एका चुकीच्या निर्णयामुळे आपल्या आई वडिलांचे घर कसे उध्वस्त होते.
आई वडिलांना भावाला बहिणीला आपल्या चुकीच्या निर्णयामुळे समाजात तोंड दाखवायला जागा राहत नाही, त्यांच्यासमोर जीवन संपवण्या शिवाय पर्याय राहत नाही केवळ आपला चुकीचा निर्णय,या विषयावर महर्षीरत्नाश्रीजी ने एक तास प्रवचन केले याप्रसंगी संस्थेचे चेअरमन डॉ. यादव यांचा सत्कार मूर्ती पूजक श्वेतांबर संघातर्फे प्रदीप बागमार व सुभाष बदामीया यांनी केला गुरुवर्याची ओळख करून देताना दिव्या अग्रवाल म्हणाल्या त्या अती श्रीमंत घरातील मुलगी असून सुद्धा सर्व ऐश्वर्य सुख समृद्धी सोडून त्या साध्वी कशा झाल्या साध्वी जीवन त्यांनी का अंगीकारले हे त्यांनी सुरेख शब्दात सांगितले डॉ.यादव यांच्या आध्यात्मिक विषयात नेहमी सहकार्य असते असे त्या म्हणाल्या.
रात्री १० नंतर मुलीने मोबाईल हातात घेणार नाही अशी अभिर्वचन गुर्वर्याने विद्यार्थिनी कडून घेतले आणि अभ्यासात लक्ष घालून आपल्या आई-वडिलांचे नाव उज्वल करावे ही शिक्षा दिली. याप्रसंगी सर्व प्राचार्य, शिक्षक, शिक्षिका नर्सिंगच्या विद्यार्थिनी डिजिटल मीडियाचे पत्रकार विजय कोरे, प्रदीप बागमार सुभाष बदामीया, कुसुम बेन राठोड, दिव्या आग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते गुरुवर्य यांनी प्रत्येक विद्यार्थी मुलींना अभिमंत्रित केलेला पेन दिला त्याचे स्पॉन्सर सुभाष बदामिया यांनी केले होते.
सौजन्य : विजय कोरे.